*पाटणसावंगीत दिवसाढवळ्या तीन ठिकाणी चोरी
रोख,सोन्याचे दागिने,व टिव्ही लंपास*
मुख्य संपादक – किशोर ढूंढेले
पाटणसावंगी – घरी कुणीही नसल्याचे पाहून अज्ञात चोरांनी दोन ठिकाणाहून रोख व सोन्याचे दागिने तर त्याच रात्री एका घरुन टी व्ही चोरुन नेल्याची घटना २७ डिसें ला येथे घडली.
येथील वार्ड नंबर ५ मधील दिलीप हरिहर कामडी हे आपल्या संपूर्ण परिवारासह घराला कुलूपबंद करुन नातेवाईकाकडे कार्यक्रमाला गेले सायंकाळी घरी परत आले असता त्यांना घराचे तुटलेले कुलूप,संपूर्ण सामान अस्तव्यस्त व कपाटातील रोख व सोन्याचे दागिने मिळून ३ लाख २० हजाराचा माल चोरीला गेला.
त्याचप्रमाणे वार्ड नं २ मध्ये राहणाऱ्या सुखदेव शेंडे हे पण घर कुलूपबंद करुन परिवारासह बाहेर गेले असता सायंकाळी परत आल्यानंतर त्यांना घरातील सामान फेकलेले व कपाटात ठेवलेले १० हजार रोख चोरी गेल्याचे दिसले.
त्याचरात्री मनीष कोहळे यांच्याकडे चोरीच्या उद्देशाने गेलेय चोरांना काहीही न मिळाल्याने त्यांनी घरातील सॅमसंग कंपनी ची ५० हजार रुपयाची टी व्ही चोरुन नेली.तिघांनीही अज्ञात चोरांविरुद्ध पोलिसात तक्रार केली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक निशांत फुलेकर तपास करीत आहे.
Maharashtra News Media सच की आवाज