Breaking News

*नामांकनपत्र दाखल करण्याची लगीनघाई* *नामांकनाच्या शेवटच्या दिवशी उसळली उम्मेदवार व समर्थकांची गर्दी*

*नामांकनपत्र दाखल करण्याची लगीनघाई*


*नामांकनाच्या शेवटच्या दिवशी उसळली उम्मेदवार व समर्थकांची गर्दी*

मुख्य संपादक – किशोर ढुंढेले

सावनेर – निवडणूक आयोगाने नुकताच ग्रामपंचायत निवडणूकीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे . या अनुषंगाने सावनेर तालुक्यात एकूण ११२ सदस्यांचे सख्याबळ असलेल्या १२ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत . यावर ताबा मिळवण्यासाठी स्थानिक गाव पुढाऱ्यांसह राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांनी कंबर कसली आहे . बारा ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या ११२ सदस्यांचे भाग्य एकूण 33 हजार 670 मतदार ठरविणार आहेत . बुधवारपासून ( ता .२३ ) ऑनलाइन पद्धतीने तहसील कार्यालयात नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली असून सुरुवातीला नामांकन अर्ज दाखल करण्याची गती संथ असली तरी नामांकन अर्ज दाखल करण्याच्यि शेवटच्या दीवशी उम्मेदवारात कमालीचा उत्साह दिसत असुन आला.

ग्रामपंचायतीच्या निवडणुका राज्यातील क्रीडा विकास , पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री सुनील केदार , यांच्या मतदारसंघात होत असल्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची समजल्या जात आहे . सावनेर तालुक्यातील गडमी , जयपुर , टेभुर्डोह , जटामखोरा , नरसाळा खापा , पाटणसावंगी , खुबाळा , खुरसापार , पोटा , सावंगी -हेटी , सोनपूर , नांदोरी या १२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर कुंभारे , जिल्हा परिषद सदस्या छाया बनसिंगे , चंद्रशेखर बनसिंगे , गोविंदा ठाकरे , विष्णू कोकड्डे ,आधी पदाधिकारी मतदात्यांशी जनसंपर्क वाढवित आहेत , तर भाजपच्या वतीने सोनबा मुसळे,मंदार मंगळे, नितीन राठी , प्रयत्नशील आहेत . ४ जानेवारी २०२१ रोजी नामनिर्देशनपत्र मागे घेण्याच्या तारखेनंतर मात्र निवडणुकीचा राजकीय आखाडा चांगलाच रंगणार असल्याची चर्चा आहे.

*समर्थकांसह उमेदवारी अर्ज दाखल*

२३ डिसेंबरपासून नामनिर्देशनपत्र भरायला सुरुवात झाली असुन आजचा नामनिर्देशनाचा शेवटचा दिवस असल्याने आप-आपल्याला समर्थकांसह दाखल करण्याकरीता उम्मेदवार व समर्थकांची तहसील कार्यालयात एकच गर्दी उसळली.ग्रा.पं.सदस्य पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करतांना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मनोहर कुंभारे , पं.स.सभापती अरुणा शिंदे , चंद्रशेखर बनसिंगे , पं.स.सदस्य गोविंदा ठाकरे , यादव ठाकरे , आदींसह मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.

*निवडणूक पारदर्शक पार पाडण्यास प्रशासन सज्ज*

सावनेर तहसील च्या नायब तहसीलदार चैताली दराडे यांनी आमच्या स्थानिक प्रतिनिधीशी संवाद साधत सागींतले की तालुक्यात होऊ घातलेल्या 12 ग्रामपंचायत निवडणुकीकरिता प्रशासन पुर्णपणे सज्ज झाले असुन सद्यस्थितीत नामनिर्देशने सुरु आहेत त्यानंतर नामांकनपत्र छाननी,नामांकनपत्र वापस घेणे व मतदान अश्या पुढच्या प्रक्रियेची तयारी पुर्ण झाली असुन वाढत्या कोरोना प्रादुर्भावावर लक्ष ठेवत प्रत्येक मतदान केन्द्रावर प्राथमिक आरोग्य केन्द्राचे प्रतिनिधीव्दारे प्रत्येक मतदात्याचे तापमान घेण्याची व्यवस्था करण्यात येत असुन संवेदनशील ग्रामपंचायत व मतदान केन्द्रावर प्रशासनाची व पोलीसांची करडी नजर राहणार असल्याची माहीती याप्रसंगी दिली.


*काँग्रेसची रायबासा/जटामखोरा ग्रामपंचात अविरोध*


*तालुक्यातील रायबासा/जटामखोरा ही सात सदस्यीय ग्रामपंचात निर्वीरोध निवडून आनण्यात काँग्रेस पक्षाला यश आले असुन येथील सात सदस्या करिता सोनु रावसाहेब यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचे विकास मरसकोल्हे,अंकुश अत्राम,सत्यफुला उईके,मंगला उईके,रीना स.रावसाहेब गीता राव,सारिका नेरकर,ममता ढोबळे व रिता स. रावसाहेब यांनी नामांकनपत्र दाखल केले तर विरोधी पक्षातून एकही उम्मेदवाराने नामांकनपत्र दाखल न केल्याने तसेच सात सदस्यीय ग्रामपंचायतीच्या निवडणूकी करीता सोनु रावसाहेब सह दहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले असल्याने दि.4 जानेवारीला नामांकन परत घेण्याच्या दिवशी तीन नामांकन वास घेतल्यावरच एकुण सात सदस्य निर्वीरोध निवडून आल्याचे जाहीर होणार असुन सदर रायबासा/जटामखोरा ग्रामपंचायत निर्वीरोध निवडून आणण्यात केळवद जिल्हा परिषद सदस्य व नागपुर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मनोहर कुंभार, तालुका काँग्रेस अध्यक्ष सतीष लेकुरवाळे, चंदु बनसिंगे,सोनु रावसाहेब आदिंनी परिश्रम घेत विजयाची सुरुवात करुण राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व क्रीडा मंत्री सुनिल केदार यांना उर्वरित 11ग्रामपंचायतीतही आपलाच विजय होईल असे जनुकाही आश्वस्त केले तर निर्वीरोध ग्रामपंचायत निवडून आणल्याबद्दल जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर कुंभारे,शहर काँग्रेस अध्यक्ष पवन जैस्वाल,अश्विन कारोकार, चंदु कामदार,सोनु देशमुख आदींनी सोनु रावसाहेब यांचे अभिनंदन केले.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …