*बेलोना येथे बालहनुमान रथ यात्रेचा शेवटचा दिवस*

*गावात पोलीस छावणीचे स्वरुप*
बेलोना प्रतिनिधी – चंद्रशेखर मस्के

नरखेड़ – दत्त जयंतीच्या पर्वावर बेलोना येथील स्वयंभू बाल हनुमान रथ यात्रेचे दरवर्षी मोठे स्वरूप असते. परंतु कोरोना महामारी त्या धोक्यामुळे प्रशासनाने दखल घेऊन या वर्षी रथयात्रा रद्दचेआदेश दिले .येथील प्रशासन ,गावातील मान्यवर ,यात्रेपूर्वी तहसीलदार ,डीवायएसपी ,आधी चर्चेत दारा बैठक सभा पार पडल्या , यात्रा भरणार नाही परंतु धार्मिक विधी पूर्णता पार पडेल .

तसेच पाच पाच च्या संख्येत सुरक्षित अंतर ठेवून दर्शन होईल असे ठरले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन होणार नाही याची खबरदारी घेण्याची जबाबदारी होती. दिनांक 29, 12 ,2020 ते दिनांक 31 ,12 ,2020 नियोजित रथयात्रेत दिनांक 29 ,12 ,2020 ला सकाळी पाच वाजता मूर्तीचे प्रगटीकरण होऊन तिची विधिवत पूजाअर्चा करून सायंकाळी पाच वाजता मूर्ती रथावर आरूढ होऊन सायंकाळीनऊ वाजता रथाची पूर्ण गावातून मिरवणूक निघत असते ,परंतु पोलिस यंत्रणेने मंदिरापासून 100 मीटर बॅरिकेट लावून कोणालाही 100 मिटर परिसरात येण्यास मनाई केली ,गावकऱ्यांनी विनंतीपूर्वक सोशल डिस्टंसिंग चे पालन करून दर्शन घेण्याची विनंती केली.

परंतु प्रशासनाने मुळीच न ऐकता सर्वांना मज्जाव केला ,रात्रीला मिरवणूक काढून न देण्यावरून जनता व पोलिसांमध्ये झडप झाल्या यामुळे गावकऱ्यांमध्ये यात्रेदरम्यान प्रचंड नाराजीचा सूर दिसून आला. 30 डिसेंबरला मूर्तीचे दुरून दर्शन होत होते. परंतु दर्शनार्थी फार कमी असून जिकडेतिकडे पोलीस असल्यामुळे यात्रेत पोलीस छावणीचे स्वरूप होते तसेच गाव बणधी कुठेच दिसली नसल्यामुळे बाहेर गावातील जनतेने सुधा दर्शनाचा आनंद घेतला .आज दिनांक 31 ,12 ,2020 यात्रेचा समारोपीय दिवस असून असंख्य भाविक दहीकाल्याचा आस्वाद घेत असे परंतु असे काहीही न होता साध्या पद्धतीने मोजक्या संखेत विधिवत समारोप होईल अशी चिन्हे दिसत आहे. आणि पुन्हा मारोती रायाला ऐक वर्षा साठी रेशमी कापडात बांधून बंदिस्त ठेवण्यात येईल .

या गावातील गावकऱ्यांच्या खूप वर्षा पासून चालत आलेली रुढी प्रथा परंपरा मोडल्या मुळे शासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे तसेच गाव पातळीवर गावात ही यात्रा गावकरी जनतेने पार पाडण्यासाठी खूब प्रयत्न केले असता त्याच्या प्रयत्नाला यश आले नाही ही नाराजी त्यांच्यात दिसत आहे तरीपण गावकरी जनतेने आपल्या गावातील ग्रामदेवतेच्या दर्शन घेऊन या कोरोना महामारीला दूर कर आणि जगावर आलेले संकट पार पड अशे मारोती रायला गावकरी जनतेने साकडे घातले आहे.
Maharashtra News Media सच की आवाज