*युवा मोर्चा चा गॄहमंत्र्यांचा निवासस्थानास घेराव घालण्याचा प्रयत्न*

नागपुर प्रतिनिधि – पवन कीरपाने
नागपूर – औरंगाबाद येथे काही दिवासांपूर्वी एका युवतीवर राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्षाने शिकवणी सुरू करण्यासाठी मदत करतो, असे आमिष दाखवून एका शिक्षिकेवर अत्याचार केल्या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर राज्यभरातील भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहे.

कार्यकर्त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानास घेराव घालण्याचा प्रयत्न केला.आंदोलकांकडून महाराष्ट्र सरकार व गृहमंत्री अनिल देशमुख विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. महाराष्ट्रात महिलांवरील वाढते अत्याचार पाहता गृहमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणीही यावेळी भाजप युवा मोर्चातर्फे करण्यात आली.

पीडित शिक्षिका शिकवणी सुरू करण्यासाठी इमारतीचा शोध घेत होती. त्यावेळी चांगली जागा शोधून देतो, असे आश्वासन आरोपीने दिले होते. या दरम्यान आरोपीने पीडितेला मुंबईला जाऊन नोकरीबाबत प्रयत्न करू शकतो,असे आश्वासन दिले होते. शिवाय राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांची भेट घालून देतो ते आपल्याला मदत करतील, असे आश्वासन दिले. आरोपीवर विश्वास ठेऊन पीडिता मुंबईसाठी निघाली. मात्र, आरोपीने वाटेत अत्याचार केल्याची तक्रार महिलेने केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्याविरुद्ध सिडको पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे, असे असताना त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याचा आरोप करत भाजपाने गृहमंत्री अनिल देशमुख यांचा प्रतिकात्मक निषेध व्यक्त केला.बुधवारी आंदोलनावेळी भाजपा युवमोर्चाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये झटापट झाली.
Maharashtra News Media सच की आवाज