Breaking News

*५ फिट रस्ता सोडण्याची मागणी* *प्रभाग क्रमांक 1 च्या नागरिकांचे जिल्हाधिकार्यांना निवेदन*

*५ फिट रस्ता सोडण्याची मागणी*

 

*प्रभाग क्रमांक 1 च्या नागरिकांचे जिल्हाधिकार्यांना निवेदन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान – पिपरी नगरपरिषद च्या हदीत येत असलेल्या प्रभाग क्रमांक 1 च्या आंबेडकर नगर सात नंबर नाका येथे संजय गायकवाड़ हे व्यक्ती घर बांधत असल्याने बाजुच्या गल्ली मधुन येणार्या – जाणार्या रस्ता बंद करण्याचा दिशेने बेताब दिसुन येत असल्याने प्रभाग क्रमांक एक च्या नागरिकांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांचासोबत या विषयावर चर्चा करुन पाच फिट रस्ता सोडण्याची मागणी एका निवेदना द्वारे केली आहे .
संजय गायकवाड़ हे व्यक्ती नगर परिषद च्या बीना परवानगी ने घराचे बांधकाम करीत असतांना प्रभाग क्रमांक 1 च्या नागरिकांनी ९-१२-२०२० ला नगर परिषद प्रशासनाला अर्ज सादर केला असुन नप प्रशासना ने कुठल्याही प्रकारची कारवाई न केल्याने नागरिकांन मध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे . जे व्यक्ती घराचे बांधकाम सुरु आहेत त्यांचा आजु – बाजुच्या घर मालकांना नगर परिषद प्रशासना ने नोटीस देऊन त्यांचा जागेच्या रजिस्ट्री नगर परिषद ला जमा करण्यास सांगुन जागेचे मोजमाप नगर परिषद करणार होती पण दिनांक २३-१२-२०२० ला नगर परिषद चे शासकीय अधिकारी , कर्मचारी , व नप नगराध्यक्षा घर बांधकाम करते वेळी न येता सायंकाळी ६ वाजता च्या दरम्यान येऊन कोणत्याही प्रकाराची मोजमाप , चौकशी न करता संजय गायकवाड़ यांचा पक्ष घेऊन चर्चा करुन बांधकाम करण्यास तोंडी परवानगी देण्याचा प्रयत्न केला असुन या प्लाट धारकाने एक फिटचे अतिक्रमण केले असुन यासाठी ग्रामपंचायत च्या काळात यांनी ते अवैधरित्या बांधलेले बांधकाम तोडण्याचा आदेश सुद्धा दिला होता . जिथे संजय गायकवाड़ घराचे बांधकाम करीत आहे तिथे लोकांना येणा – जाण्याकरिता तो एकच मार्ग असुन तो पाच फिटचा रस्ता ५० ते ६० वर्षापासुन वापरत असुन आमच्या करिता दुसरा रस्ता नाही . यामुळे प्रभाग क्रमांक 1 च्या नागरिकांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांचासोबत या विषयावर चर्चा करुन व एक निवेदन देऊन पाच फिट चा रस्ता सोडण्याची मागणी केली . यावेळी सामाजिक कार्यकर्ता संजय रंगारी , अविनाश नागदेवे , शालु दिलीप बेलेकर , नितु वसंता अनकर , परिनिता अनकर , मुक्ताबाई अनकर , दिपा बगडते , वच्छना बगडते , बेबी बाई बगडते , सचिन बगडते , पौर्णिमा नंदेश्वर , बेबीबाई वासनिक , कविता वासनिक , प्रतिक विश्वकर्मा , सह अनेक नागरिक उपस्थित होते .

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …