*वनविभागचा अधिकारी यांच्या मुड़े मनसे तालुका अध्यक्ष वैभव डहाने यांच्या जीवाला धोका*
*तालुका अध्यक्ष वैभव डहाने यांच्या आरोप*
वरोरा प्रतिनिधि – जुबेर शेख
वरोरा – तालुक्यात बेधडपने जेसीबी मशीन च्या मदतिने नदीपात्रातुन अवैधरित्या रेती उत्खनन जोरात सुरु आहे . तालुक्या तिल नदीपत्रातुन वनविभागाच्या हद्दीतिल नाल्यातुन रात्रिच्या अंधारा चा फायदा घेत अवैध उ्खनन सुरु आहे, या मध्ये वनविभागाचे अधिकारी डोऴे मिटून दूध पित असल्याची चर्चा आहे, वानविभागाच्या आशीर्वादाशिवाय अवैध उ्त्खनन अशक्य आहे,यामुळे अधिकार्याच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, वनविभाग अधिकारी राठौड़ यानी एका ट्रैक्टर वर वन क्षेत्रातुन अवैध रेती तस्करी करित असल्याचा आरोपाखाली कारवाही केली व मनसे तालुका अध्यक्ष वैभव डहाने ला कॉल करा ते म्हनतिल तर मी ट्रैक्टर सोड़तो असे सांगीतले याच्या मागे जानिवपुर्वक ट्रैक्टर मालक आनी मनसे तालुका अध्यक्ष वैभव डहाने यांच्या मध्ये रोष निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे ,असे मनसे तालुका अध्यक्ष वैभव डहाने यांचे म्हनने आहे, या बाबतची कॉल रिकॉर्डिंग सुद्धा व्हायरल झाली आहे.
या प्रकरनी वैभव डहाने यानी वरोरा पुलिस स्टेशन येथे वनविभाग अधिकारी राठोड़ व रामटेके यांच्या विरूद्ध तक्रार नोंदविली आहे, पुढ़िल तपास वरोरा पुलिस स्टेशन करित आहे, मागिल २ वर्षपासुन रेती घाट लिलाव न झाल्याने सामान्य नागरिकांचे घरकाम तसेच शासकीय बांधकमात चोरिची रेती वापरत लाखो रुपयाचा शाशनाचा महसुल बुड विन्याच्या प्रकार सुरु आहे.
Maharashtra News Media सच की आवाज