*सोनपुर-आदासा गटग्रामपंचायत बिनविरोध*

*मंत्री केदार यांच्या विनंतीचा राखला गावकऱ्यांनी मान*
मुख्य संपादक – किशोर ढुंढेले
कळमेश्वर – कळमेश्वर तालुक्यातील 15 जानेवारीला होऊ घातलेल्या पाच गट ग्रामपंचायत निवडणुकीत सोनपूर आदासा ही गट ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे.ही गट ग्रामपंचायत बिनविरोध व्हावी असे आव्हान राज्याचे पशुसंवर्धन,दुग्ध व्यवसाय व व युवक क्रीडा कल्याण मंत्री सुनील केदार यांनी केले होते त्यांनी केलेल्या आव्हानाला गावकऱ्यांनी प्रतिसाद देत ही ग्रामपंचायत बिनविरोध करून दिली.

नागपुर जील्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील श्री शेत्र आदासा येथील गणपती मंदिर हिंदू धर्माचे पवित्र स्थान आहे याठिकाणी हजारो भाविक दर्शनाला येत असतात. त्यामुळे आदासा हे गाव विदर्भात नावलौकिक आहे येथे पवित्र गणपती मंदिर असल्याने तेथील जनतेने निवडणूक न लढवीता गटग्रामपंचायत ही बिनविरोध करावी असे प्रयत्न सुनील केदार यांनी केले होते. सोनपूर आदासा येथील गावकऱ्यांनी मंत्री केदार यांच्या बॅनरखाली ही निवडणूक अविरोध केली. नऊ सदस्य असलेल्या गट ग्रामपंचायत साठी नऊ नामांकन पत्र प्राप्त झाल्याने त्यांच्याविरोधात कोणी ही नामनिर्देश पत्र न टाकल्याने ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे.

नवनिर्वाचित सदस्यामधे निलेश रामभाऊ कडू,लीना संजय कडू,नीता प्रभाकर जिचकार,अक्षय धुर्वे,नीतू सहारे,अलका सुधाकर पडोळे, चेतन शिवकुमार निंबाळकर,शिल्पा रवींद्र,पडोळे सुरेखा, व विठोबा गायकवाड यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले परंतु यांच्या विरोधात एकही अर्ज न आल्याने त्यांचाच विजय निश्चित झाला आहे. जि प सदस्य महेंद्र डोंगरे, खरेदी-विक्री अध्यक्ष बाबा कोठे,उपसभापती जयश्री वाळके,माजी सभापती वैभव घोंगे,माजी उपसभापती नरेंद्र पालटकर,माजी सरपंच राजेंद्र जिचकार,गणपत काकडे,नागोराव भोयर,प्रकाश धोटे,संजय कडू,सुधाकर पडोळे,रवींद्र जिचकार, किशोर नागपुरे,नागोराव कोहळे, अजाबराव चिखले, उकंडराव धवड,संदीप गोतमारे, अजाबराव चिखले,श्रीराम धोटे,शिवकुमार पडोळे,इसाक शेख,श्रावण पडोळे,बालाजी कडू व इतर मान्यवरांच्या सहकार्याने ही निवडणूक अविरोध झाली आहे.
सोनपुर आदासा गटग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्याने गावाचा विकास होईल ही बाब समजून देण्यात आले.तेथील गावकऱ्यांनी सुद्धा सहकार्य करून एकमताने निर्णय घेतला.आज केदार यांना मंत्री होऊन एक वर्ष पूर्ण होत आहे व नवीन वर्षाला ही ग्रामपंचायत बिनविरोध करून सोनपुर आदासा गटग्रामपंचायतीच्या गावकऱ्यांनी मंत्री सुनील केदार यांना नवीन वर्षाची भेट दिली असल्याचे मत माजी सरपंच व काँग्रेस प्रवक्ता नागपुर राजेंद्र जिचकार यांनी व्यक्त केले.
Maharashtra News Media सच की आवाज