*ऑनलाईन सहज योग ध्यान, घरच्या घरीच निःशुल्क समाधान*
*३ जानेवारी पासून सहज योग ध्यानाला सुरुवात*
विशेष प्रतिनिधी खापरखेडा
खापरखेडाः नविन वर्षाच्या सुरुवातीस नविन संकल्प म्हणून राष्ट्रीय सहयोग ट्रस्ट नवी दिल्ली तथा सहज योग प्रतिष्ठान पुणे द्वारे सहज योग स्थापनेच्या स्वर्ण जयंती वर्षा निमित्त संपूर्ण देशात १६ भारतीय भाषा मधून सलग १२ तास ऑनलाइन ध्यान प्रशिक्षण तथा अनुभूतीचा अभिनव कार्यक्रम दिनांक ३ जानेवारी २०२१ रोज रविवारला आयोजित केलेला आहे प्रत्येक भाषेतून ४५ मिनिटांच्या सत्रात सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत www.sahajayoga.org.in/live या बेबसाईटवर ध्यान शिकवले जाईल सकाळच्या पहिल्या सत्राची सुरुवात संस्कृत भाषेतून होणार आहे.
संस्थेच्या संस्थापिका प. पू. श्रीमाताजी निर्मलादेवी यांनी सहजयोग स्थापन १९७० साली केली संपूर्ण विश्वात या ध्यान पद्धतीचा लाभ १५० देशामधील साधक घेत आहेत प. पू. श्रीमाताजी निर्मलादेवी यांना दोन वेळा त्यांच्या वैश्विक शांती व बंधूभाव प्रस्तापनेच्या उल्लेखनीय कार्यासाठी नोबल पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आले आहे.
सहजयोग ध्यानामूळे आंतरिक चेतनच्या आनंदासह, निरंतर रोगप्रतिकारक शक्ती, स्वस्थ शरीर, आत्मविश्वास, सृजनशील व्यक्तिमत्व व तणावपूर्ण जिवन, सहज साध्य होते.
सहजयोग परिवाराद्वारे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध शासकीय कार्यालये, व्यवसायिक प्रतिष्ठाण, शैक्षणिक संस्था तसेच जनसामान्यांसाठी सार्वजनिक स्तरावर ध्यान्याच्या प्रत्येक अणूभूतीचे कार्यक्रम आयोजित केले जातात. मराठी भाषेतून ध्यान प्रशिक्षण कार्यक्रम सायंकाळी ५.१५ ते ६.०० हिंदी भाषेतून सकाळी ९.४५ ते १०.३० तर इंग्रजी भाषेतून सायंकाळी ७.३० ते ८.१५ पर्यंत करण्यात आले आहे आंतरिक समृद्धीचा दैवी आशिर्वाद प्राप्त करण्यासाठी सहजयोगाच्या योगाच्या निःशुल्क ध्यान प्रशिक्षण कार्यक्रमात जनसामान्यांना सहभागी होण्याचे आव्हाण ऍडव्हकेट महेश धांडेकर व जिल्हा समन्वयक डॉ विवेक काळे यांनी केले आहे.
Maharashtra News Media सच की आवाज