Breaking News

*नागपूरमध्ये भररस्त्यात गावगुंडाने शिक्षिकेची छेड काढत त्यांचे केस पकडून रस्त्यावर ओढत विनयभंग केला*

*नागपूरमध्ये भररस्त्यात गावगुंडाने शिक्षिकेची छेड काढत त्यांचे केस पकडून रस्त्यावर ओढत विनयभंग केला*

नागपुर प्रतिनिधि -पवन कीरपाने

नागपुर – भर रस्त्यात शिक्षिकेची छेड काढल्यानंतर तिला केसांना पकडून रस्त्यावर ओढल्यानंतर आणि रोखायला आलेल्या वाहतूक पोलिसांचीही धुलाई केल्यानंतर हे एका गावगुंडाचे शब्द मेरा नाम याद रखना.. घर में घुस के मारेंगे, पोलीस कि कुछ नहीं चलती.
राजकिरण राजहंस नावाच्या या गावगुंडाने पोलिसांच्या उपस्थितीत एका शिक्षिकेला धमकावले आहे. नवीन वर्षाच्या संध्याकाळी नागपूरच्या शांतीनगर परिसरात राहणारी एक शिक्षका आपल्या कुटुंबियांसह बालोद्यान फिरायला आली होती. संध्याकाळी सर्व कुटुंबीय घरी परत जात असताना त्यांच्या दुचाकीने काही गुंडाच्या दुचाकीला कट लागला. गुंडांनी लगेच आपल्या बाईकने शिक्षिका आणि तिचा भाऊ बसलेल्या दुचाकीचा पाठलाग सुरू केला. राजभवनाच्या मागील गेटजवळ त्यांना अडवत शिवीगाळ करणे सुरू केले. प्रचंड नशेत असलेल्या एका गुंडाने थेट शिक्षिकेच्या अंगावर हात घालत तिला रस्त्यावर केस पकडून ओढले.

शिक्षिकेच्या कुटुंबाने मदतीसाठी आरडाओरड करत असताना जवळून जाणारे वाहतुक पोलीस तिथे पोहोचले. त्यांनी गुंडांना रोखण्याचा प्रयत्न केला असता गुंडांनी वाहतूक पोलिसांवर हल्ला चढवत त्यांची धुलाई केली. प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी नियंत्रण कक्षाला माहिती दिली. गिट्टीखदान पोलीस स्टेशन वरून अतिरिक्त पोलीस पोहचल्यावर तिन्ही गुंडांना आवरणे शक्य झाले. गिट्टीखदान पोलीस स्टेशन मधून आलेल्या पोलिसांनी मिळून या गुंडाना आवरले आणि पकडून पोलीस स्टेशनला नेले. पीडित शिक्षिकेच्या तक्रारींवर पोलिसांनी राजकिरण राजहंस आणि राकेश राऊत वर कलम 354 अन्वये छेडखानी, विनयभंगाचा गुन्हा नोंदवत अटक केली आहे. या गुंडांचा एक सहकारी फरार झाला आहे.गिट्टीखदान पोलीस स्टेशन मधून आलेल्या पोलिसांनी मिळून या गुंडाना आवरले आणि पकडून पोलीस स्टेशनला नेले. पीडित शिक्षिकेच्या तक्रारींवर पोलिसांनी राजकिरण राजहंस आणि राकेश राऊत वर कलम 354 अन्वये छेडखानी, विनयभंगाचा गुन्हा नोंदवत अटक केली आहे. या गुंडांचा एक सहकारी फरार झाला आहे.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …