Breaking News

*147 वर्ष पुराण्या पुलाचा केला केक कापून वाढदिवस साजरा* *पर्यायी नवीन पुलाचे बांधकाम त्वरित सुरू करावे अशी मागणी*

*147 वर्ष पुराण्या पुलाचा केला केक कापून वाढदिवस साजरा*

 

*पर्यायी नवीन पुलाचे बांधकाम त्वरित सुरू करावे अशी मागणी*

 

रामटेक प्रतिनिधि – पंकज चौधरी

रामटेक –पर्यटन क्षेत्राच्या दृष्टीने अतिशय सुरेख आणि प्राचीन म्हणून कन्हान येथील पुलाकडे पाहिल्या जाते.भारत देश जेव्हा इंग्रजांच्या गुलामगिरीत होता त्याकाळात या पुलाचे बांधकाम झाल्याचे आपणांस दिसून येते.सण 1874 मध्ये कन्हान येथे या पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले होते.त्याला आज 147 वर्ष पूर्ण होत आले.इतका मोठा प्रवास करून देखील हा पूल जसाचा तसा उभा असलेला दिसून येतो. याच पुलावरून NH-7 या आंतरराष्ट्रीय महामार्गाने जाणारे सर्व वाहन येत-जात असतात.काही वर्षाआधी रायगड जिल्ह्यातील महाड या ठिकाणी सावित्री नदीवर अश्याच प्रकारच्या पुलाच्या तुटण्याची बातमी ऐकू येऊन खूप मोठी दुर्घटना झालेली दिसून आली होती.अशा प्रकारच्या घटना पुन्हा होऊ नये याकरिता प्रशासनाने पुलाच्या पर्यायी नवीन पुलाचे सतत 7 वर्षांपासून सुरू असलेले काम जलद गतीने सुरू करावे,असे शेतकरी नेते संजय सत्येकार यांनी सांगितले.तसेच पर्यटन क्षेत्राच्या हिशोबाने 147 वर्ष पुराण्या या पुलाचे पर्यटन विभागाने जतन केले पाहिजे असे देखील सांगितले.याच संदर्भात 1 जानेवारी 2021 ला संजय सत्येकार यांच्या मार्गदर्शनात केक कापून या पुलाचा जन्म दिवस साजरा करण्यात आला.यावेळी संजय सत्येकार,भगवानदास यादव,राजू गुडधे,शंकर इनवाते आदी उपस्तीत होते.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …