Breaking News

*आदिवासी विकास मंत्री महाराष्ट्र राज्य मा. के. सी. पाडवी यांचा जाहीर निषेध* *महाराष्ट्र आदिवासी गोवारी समाज संघटन च्या वतीने निषेध कार्यक्रम संपन्न*

*आदिवासी विकास मंत्री महाराष्ट्र राज्य मा. के. सी. पाडवी यांचा जाहीर निषेध*

*महाराष्ट्र आदिवासी गोवारी समाज संघटन च्या वतीने निषेध कार्यक्रम संपन्न*

कन्हान प्रतिनिधि- ॠषभ बावनकर

कन्हान – महाराष्ट्र आदिवासी गोवारी समाज संघटन च्या वतीने आदिवासी गोवारी समाजावर घटना बाहय निर्णय लागल्या बद्दल कन्हान आंबेडकर चौक येथे जाहिर निषेध सभा घेऊन आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांचा जाहीर निषेध करण्यात आला.
गुरूवार दिनांक ३१ ला डॉ आंबेडकर चौक कन्हान येथे डॉ बाबासाहेब आबेंडकर यांच्या प्रतिमेस हार माल्यार्पण करुन विनम्र अभिवादन करित जाहिर निषेध सभेला सुरूवात करण्यात आली. यावेळी शुक्रवार दिनांक १८/१२/२०२० ला दिलेल्या सुप्रीम कोर्टाचा निर्णयात के.सी.पाडवी यांनी दिशाभुल केली व घटना बाह्य निर्णय गोवारी समाजावर लागण्यात आल्याने समाज बांधवावर अन्याय करून या सर्व घटना क्रमा वर के. सी पाडवी यांनी वैयक्तिक वैर असल्यागत गोवारी समाजावर अन्यायाची पुनरावृत्ती केली.असे प्रतिपादन श्री भगवानजी भोंडे आणि श्री आनंद सहारे यांनी व्यक्त केले. आम्ही गोवारी पुन्हा १९९४ पेक्षा अधिक ताकतीने मोठ्या जोमाने सरकारला न्याय देण्यास भाग पाडु , आमचा संघर्ष अजून संपलेला नाही. असे संबोधन दिनकर सोनवाने आणि मुरलीधर सोनवाने यांनी सांगितले असुन पार्टी पक्षाच्या वादाला दुर ठेवुन सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या निषेध सभेला पाठिंबा दिला.

 

या जाहिर निषेध कार्यक्रमात विनायकजी वाघधरे, राजेंद्र हटवार , कल्याण अडकणे, संगीता वांढरे , सामाजिक कार्यकर्ता रिंकेश चवरे, स्वप्निल वाघधरे, लिलाधर बर्वे, सचिन वासनिक, भगवान सरोदे, शिवशंकर चकोले, रंजनिश (बाळा) मेश्राम आदि प्रामुख्याने उपस्थित होते. आदिवासी गोवारी समाज संघटन महाराष्ट्र पारशिवनी तालुका अध्यक्ष नेवालालजी सहारे, नगरसेवक अनिल ठाकरे, भोलाजी वगारे मुसेवाडी, मारोती गाते , चैतराम मानकर , श्रीमती येणुबाई वाघाडे , कुसुमताई सोनवाने , विशाल नेवारे, ईश्वरजी राऊत, राधेश्याम चचाने, सत्येन शेन्द्रे, रामाजी वाघाडे, प्रकाश सोनवाने, मनोज चौधरी, लोकेश राऊत , ललित कुमार सहारे, ज्ञानेश्वर नेवारे आदि अनेक गोवारी समाज संघटनेचे पदाधिकारी व समाज बांधव यांनी उपस्थित राहुन आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांचा जाहीर निषेध केला. या जाहिर निषेध सभेचे आभार विनोद कोहळे यांनी व्यक्त केले.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …