Breaking News

*कन्हान येथे विविध संघटनांनी क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांची जयंती केली साजरी* *विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन*

*कन्हान येथे विविध संघटनांनी क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांची जयंती केली साजरी*

 

*विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान शहरात विविध संघटने द्वारे क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले यांचा जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करुन सावित्रीबाई फुले यांचा प्रतिमेवर हार माल्यार्पण करुन व पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करण्यात आले .

 

*कन्हान – पिपरी नगरपरिषद*

कन्हान – पिपरी नगरपरिषद येथे क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले यांचा जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करुन नप नगराध्यक्षा करुणा आष्टणकर यांनी सावित्रीबाई फुले यांचा प्रतिमेवर हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात केली असता उपाध्यक्ष योगेंद्र रंगारी यांनी सावित्रीबाई फुले यांचा जीवनावर मार्गदर्शन केले असुन कार्यक्रमात उपस्थित सर्व नगरसेवक , नगरसेविकांनी सावित्रीबाई फुले यांचा प्रतिमेवर पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करण्यात आले .
कार्यक्रमात विरोधी पक्ष नेता राजेंन्द्र शेंदरे , नगरसेविका रेखा टोहणे , नगरसेवक विनय यादव , अनिल ठाकरे , प्रदीप बावने , अमोल प्रसाद सह अनेक नप कर्मचारी उपस्थित होते.

 

*कन्हान शहर विकास मंच*

कन्हान शहर विकास मंच च्या वतीने क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले यांचा जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करुन मंच अध्यक्ष प्रवीण गोडे यांनी क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले यांचा प्रतिमेवर हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात केली असता मंच सचिव प्रदीप बावने , सुप्रित बावने , अखिलेश मेश्राम , पौर्णिमा दुबे व अजय चव्हान यांनी सावित्रीबाई फुले यांचा जीवनावर मार्गदर्शन केले असुन परिसरात मिठाई वाटप करण्यात आली असता सर्व मंच पदाधिकार्यांनी सावित्रीबाई फुले यांचा प्रतिमेवर पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करण्यात आले .
त्यानंतर पंचशील बुद्ध बिहार येथे कन्हान शहर विकास मंच महिला सदस्य पौर्णिमा दुबे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेवर , गौतम बुद्ध यांचा प्रतिमेवर व सावित्रीबाई फुले यांचा प्रतिमेवर हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता कार्यक्रमात उपस्थित असलेले नागरिकांनी सावित्रीबाई फुले यांचा जीवनावर मार्गदर्शन करुन व सावित्रीबाई फुले यांचा प्रतिमेवर पुष्प अर्पित विनम्र अभिवादन करण्यात आले .
कार्यक्रमाचे सुत्र संचालन मंच अध्यक्ष प्रवीण गोडे यांनी केले तर आभार मंच सचिव प्रदीप बावने यांनी व्यक्त केले .
कार्यक्रमात कन्हान शहर विकास मंच के अध्यक्ष प्रवीण गोडे, उपाध्यक्ष रुषभ बावनकर , सचिव प्रदीप बावने , महासचिव संजय
रंगारी , हरीओम प्रकाश नारायण , सुप्रित बावने , इस्प्रित बावने , सतीश ऊके , अखिलेश मेश्राम , पौर्णिमा दुबे , अजय चव्हान , सुरेश वाघमारे , सोनु खोब्रागडे , सुषमा मस्के , वैशाली खंडार , सह अनेक मंच पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .

 

*कांन्द्री येथे सावित्रीबाई फुले जयंती हाजरी*

कांन्द्री येथे सावित्रीबाई फुले यांचा जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करुन सामाजिक कार्यकर्ता गजानन हटवार यांचा हस्ते सावित्रीबाई फुले यांचा प्रतिमेवर हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांचा जीवनावर मार्गदर्शन केले .कार्यक्रमाचे सुत्र संचालन शशिकला बागडे यांनी केले तर आभार रंजना मेश्राम यांनी मानले .यावेळी प्रकाश वरकडे , गणेश सरोदे , हेमराज मस्के , अंकुश कुंभलकर , सह अनेक नागरिक उपस्थित होते . कार्यक्रम यशस्विते करिता कांताबाई नांदुरकर , शशिकला बागडे , स्वेता टेंभरे , विद्या पानतावने , कौशल्या पंधराम , भरती वानखेडे , विशाखा वानखेडे , रीना सुखदेवे , रीना वाहने , साधना साखरे , करूणा करुन विनम्र अभिवादन करण्यात आले .

*कन्हान पोलीस स्टेशन*

कन्हान पोलीस स्टेशन येथे सावित्रीबाई फुले यांचा जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करुन एपीआई अमित कुमार आत्राम यांचा हस्ते सावित्रीबाई फुले यांचा प्रतिमेवर हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता महिला पोलीस कर्मचारी कल्पना चौधरी यांनी सावित्रीबाई फुले यांचा जीवनावर मार्गदर्शन केले . कार्यक्रमात ए . एस . आय जोसेफ , नालंदा पाटील , विरेंन्द्र सिंह चौधरी , सतिश तांदळे , समित्र वनस्पती , शैफुऊला शेख , सह अनेक पोलीस कर्मचारी उपस्थित होते .

*संघमित्र वंदना संघ ,तथागत सवयमसाहयता महिला समुह , सावित्रीबाई फुले फंड*

संघमित्र वंदना संघ , तथागत सवयमसाहयता महिला समुह , व सावित्रीबाई फुले फंड
द्वारे सावित्रीबाई फुले यांचा जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन पाटील नगर येथे करण्यात आले असुन उपस्थित महिलांनी सावित्रीबाई फुले यांचा प्रतिमेवर हार माल्यार्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले असुन कार्यक्रमात उपस्थित महिलांनी सावित्रीबाई फुले यांचा जीवनावर मार्गदर्शन करुन सावित्रीबाई फुले जयंती थटात साजरी करण्यात आली. कार्यक्रमात मोठ्या संख्येत महिला उपस्थित होते .

*सम्राट अशोक बुद्ध चैरिटेबल ट्रस्ट*

सम्राट अशोक बौद्ध चैरिटेबल ट्रस्ट द्वारा सावित्रीबाई फुले यांचा जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन गणेश नगर बुद्ध बिहार येथे करण्यात आले असुन कार्यनक्रमाचे अध्यक्ष अशोक ऊके यांनी सावित्रीबाई फुले यांचा प्रतिमेवर हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता मुख्य अतिथि स्वातिताई गोंडाने यांनी सावित्रीबाई फुले यांचा जीवनावर मार्गदर्शन केले असुन मान्यवरांना मिठाई वाटप करुन लहान मुलांना बुक , पेन , व पेंसिल वितरीत करण्यात आली . कार्यक्रमाचे सुत्र संचालन सम्राट अशोक बौद्ध चैरिटेबल ट्रस्ट चे कोषाध्यक्ष यांनी केले तर आभार उपाध्यक्ष राकेश चव्हान यांनी व्यक्त केले . सम्राट अशोक बौद्ध चैरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष भदंत आर्य केबीएस लामा महाथेरो यांचा अध्यक्षते मध्ये कार्यक्रमाचे समापन करण्यात आले असुन कार्यक्रमात कुसुम चौव्हान , कल्याणी चौहान , राजेश सवाईफुल , विदेश भोवते , गौतम खंदारे सह अनेक नागरिक उपस्थित होते .

*कांग्रेस कमेटी नागपुर जिल्हा*

नागपूर जिल्हा ग्रामीण महिला काँग्रेस कमेटी च्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करुन सावित्रीबाई फुले यांचा प्रतिमेवर पुष्प हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन,क्रिडा व युवक कल्याण मंत्री मा.ना.सुनिलभाऊ केदार यांनी सावित्रीबाई फुले यांच्या धर्मसुधारक विचाराचा आजच्या समाजाला गरज आहे . असे प्रतिपादन आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी चे महासचिव नानाभाऊ गावंडे ,जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.रश्मिताई बर्वे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमेटी च्या अध्यक्षा सौ.तक्षशिलाताई वाघधरे होत्या . महिला उद्योजिका सौ.मीनाताई भागवतकर,शिक्षण व अर्थ समिती जि.प.नागपूरच्या सभापती सौ.भारतीताई पाटील,समाज कल्याण सभापती सौ.नेमावलीताई माटे,अनु.जाती विभागाचे अध्यक्ष श्री.राहुलभाऊ घरडे,जि.प.सदस्य सौ.अवंतिकाताई लेकुरवाळे,सौ.ज्योतीताई सिरसकर,सौ.उईकेताई, वैशालीताई मानवटकर ,सौ.योगिताताई इटनकर ,सौ.शालीनीताई मनोहर , सौ.सविताताई भड,सौ.वंदनाताई कुंभारे,सौ.अश्विनीताई नागमोते,सुरैय्या बानो व माधुरीताई देशमुख उपस्थित होते. यावेळी सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्याबाबत तसेच महिलाकरीता घरेलू कामगार मंडळाची नव्याने पुर्नरचना करण्याची यावी अशी मागणी महिला काँग्रेस कमेटी तर्फे करण्यात आली आहे. कार्यक्रमाचे सुत्र संचालन सौ.मनिषाताई लोहकरे, यांनी केले तर आभार सौ.संगिताताई चव्हाण यांनी मानले . कार्यक्रम यशस्विते करिता सौ.श्यामलाताई वाघधरे सौ . लताताई लुंढेरे सह अनेकांनी सहकार्य केले.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …