Breaking News

*कन्हान क्षेत्रात सावित्रीबाई फुले यांची जयंती थटात साजरी*

*कन्हान क्षेत्रात सावित्रीबाई फुले यांची जयंती थटात साजरी*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान क्षेत्रात मोठ्या उत्साहाने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती थटात साजरी करण्यात आली .

*सत्यशोधक महिला मंडळ व धनगर समाज महिला मंडळ*

सत्यशोधक महिला मंडळ व धनगर समाज महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांती ज्योती सावित्रीबई फुले यांची जयंती महिला शिक्षक दिन म्हणुन थटात साजरी करण्यात आली.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेवर कार्यक्रमाचे अध्यक्ष छायाताई कुरटकर व प्रमुख अतिथी सुनंदाताई बांबल यांच्या हस्ते हार माल्यार्पण आणि दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता उपस्थित महिलांनी सावित्रीबाई फुले यांचा जीवनावर मार्गदर्शन करुन व विनम्र अभिवादन करून विद्यानगर वाठोडा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षक दिन म्हणुन थटात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शोभाताई डहाके यांनी केले तर आभार छायाताई वासनिक यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी ते साठी रेखाताई बिरे, विनाताई लव्हाळे, कल्पनाताई डहाके, शकुंतला वांढरे, वृषाली डहाके, खुशी, कैलास कुरूटकर, संजय लव्हाळे आदी ने सहकार्य केले.

*शिवशक्ती आखाडा बोरी*

शिवशक्ती आखाडा बोरी च्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहाने थटात साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा प्रतिमेवर प्रयास फाउंडेशन चे अध्यक्ष मा. राकेश बागवे यांच्या हस्ते हार माल्यार्पण करून मुलांना सावित्रीबाई फुले यांच्या जिवनावर मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर ४ लहान मुलांची आणि ३ मोठया मुलांची भाषणे सादर झालीत. तसेच लहान मुलांनी एक देशभक्ती पर गीत ” मेरा रंग दे बसंती चोला” हे गीत सादर केल. मुलांना प्रसाद वितरीत करून सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षक दिन म्हणुन मोठ्या उत्साहाने थटात साजरी करण्यात आली . कार्यक्रमात शिवशक्ती आखाडा बोरी (सिंगारदिप) प्रमुख पायल येरणे, निकिता येरणे, प्रयास फाउंडेशन चे अध्यक्ष मा. राकेश बागवे व त्यांचे सहकारी उपस्तित होते. कार्यक्रम यशस्विते करिता ईशा भोले, सुहानी येरणे, निधी नागपुरे, हर्षल राऊळ, अंजली येवले, तृप्ती येवले, नंदिनी भोले, अंजली आदीने सहकार्य केले.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …