*नवीन प्रकारचा सेक्स ठरला जीवघेणा*
*”पाँर्न” ने केला घात*
*जिवघेण्या आधुनिकतेचा फसला प्रयोग*
*पॉर्न फिल्म पाहून सेक्स करण्याची विकृती एका तरुण इंजिनिअरच्या जीवावर बेतली आहे. त्याने केलेल्या अचाट पराक्रमामुळे गळफास लागून मृत्यू झाला.*
खापरखेडा प्रतिनिधि – अरुण महाजन
खापरखेडा –पॉर्न फिल्म पाहून सेक्स करण्याची विकृती नागपूरमधील एका तरुण इंजिनिअरच्या जीवावर बेतली आहे. त्याने केलेल्या अचाट पराक्रमामुळे गळफास लागून मृत्यू झाल्याची घटना घडली. लॉजवर हा प्रकार घडल्याने नागपूर शहरात खळबळ उडाली.
समोर आलेल्या माहितीनुसार या घटनेत मृत्यूमुखी पडलेला तरूण २७ वर्षीय असून तो पेशाने इंजिनिअर होता. त्याचे एका तरुणीशी प्रेमसंबंध जुळले होते. त्यामुळे प्रेमाचा आनंद ते फिरण्यासाठी गेले होते. त्यांनी फिरण्यासाठी गेल्यानंतर सावनेर तालुक्यातील खापरखेडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका लॉजमधील रुम बुक केली होती. लॉजवर दोघांमध्ये शरीर संबंध आले.
पोलीस स्टेशन अंतर्गत दहेगाव रंगारी येथे असलेल्या महाराजा लॉन लगत असलेल्या महाराजा लॉज मधील रूम मध्ये नवीन प्रकारचा सेक्स करण्याऱ्या जोडप्या पैकी मुलाचा गळफास लागून मृत्यू झाली. ही घटना गुरुवारी सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान घडली. मृतक टेकानाका नागपूर निवासी 27 वर्षीय जियाउद्दिन सलाउद्दीन आहे. तो इंजिनियर असून बेरोजगार होता. त्याचे हबीब नगर टेकानाका नागपूर येथील 26 वर्षीय युवती सोबत प्रेमसंबंध होते. सलाउद्दीन ची प्रेयसी ही खाजगी कंपनीत जॉब करते. दोघेही आज सोबत दहेगाव रंगारी येथील महाराजा लॉज मध्ये आले. तेथे त्यांनी रूम घेतली. रूम मध्ये गेल्यावर त्यांनी सेक्स केला. नवीन प्रकारचा सेक्स करून आनंद घ्यावं असं त्यांनी ठरवलं. दोघांनीही सेक्स चा व्हिडीओ बघितला. त्या व्हिडीओ मध्ये युवक हा चेयर वर नग्न अवस्थेत बसला होता. खुर्चीला युवकाचे हात आणि पाय बांधलेले होते तर गळ्यात गळफासही लावलेला होता. हा व्हिडीओ बघून तसाच प्रकार या दोघांनीही केला. सेक्स झाल्या नंतर युवती बाथरूम मध्ये गेली. मात्र सलाउद्दीन खुर्ची वरच दोरखंडणे बांधलेल्या अवस्थेतच होता. समाउद्दीनच खुर्ची वरून नियंत्रन सुटले आणि तो खुर्ची सोबत खाली पडला मात्र त्याच वेळेस त्याच्या गळ्यात असलेल्या गळफास ने त्याचा गळा आवळल्या गेल्याने गलफास लागून त्याचा मृत्यू झाला. बाथरूम मधून युवती बाहेर आली तेव्हा जियाउद्दिन मृत आढळला. लॉज व्यवस्थापनास युवतीने माहिती दिली.
खापरखेडा पोलीस ठाण्याचे पीएसआय सूर्यप्रकाश मिश्रा , गुरुप्रकाश मेश्राम संतोष बैरागी यांनी घटस्थळी जाऊन पंचनामा केला . प्रेतउत्तरीय तपासनीस नागपूर पाठवण्यात आले. युवतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी अकस्मितमृत्यू चा गुन्हा दाखल केला आहे।