*सात महिन्याच्या गर्भवती मातेला संदर्भ सेवा*

पेरमिली प्रतिनिधि – श्रीकांत दुर्ग
पेरमिली – दिनांक ०६/०१/२०२१ रोज बुधवार ला विसामुंडी येथील गर्भवती मातेला संदर्भ सेवा देण्यात आली.
गुंडापुरी येथे आयोजित बालकांचे वजन-उंची ,Community IYCF प्रशिक्षण व राष्ट्रीय किशोरी स्वास्थ कार्यक्रम पार पाडून विसामुंडी आरोग्य उपकेंद्र येथे परत आले असता, तेथील आशा सेविकेनी सायंकाळी ६.१५ वाजता सदर मातेची माहिती सांगितल्या.
निरंजना बिचांगा तलांडे वय-३४, खेप-३,वजन -४४Kg, चालू महिना -०७* मातेच्या गर्भाशयातील पाणी निघायला लागले अशी माहिती सांगितल्यावर आरोग्य सेविका व आरोग्य सेवक हे त्वरित मातेची तपासणी करण्याकरीत गेलेत. मातेची तपासणी केली असता तिच्या गर्भाशयातील पाणी वाहायला लागले असून तिला त्वरित रुग्णलायात घेणून जावे लागेल असे त्यांनी सांगितले.
परंतु ती माता व तिच्या घरचे तिला रुग्णालयात नेण्यासंदर्भात मान्य नव्हते तेव्हा क्षेत्र समन्वयक श्रीकांत नैताम, आरोग्य सेविका अरुण गोरकर, आरोग्य सेवक कुमरे , किरण नेते (RKSK Counselor) व क्षयरोग नियंत्रक मोडक सर यांनी मातेच्या घरच्यांना व मातेला समुपदेशन करून करून रुग्णालयात जाण्यासाठी तयार केलं.
त्यांनतर विषय आला तो वाहनाचा कारण विसमुंडी येथे कुठलेही ४चाकी वाहन नाही व योग्य रस्ता पण नाही त्यावेळी रुग्ण वाहिकेशी संपर्क साधला असता ती फक्त बोटनफुंडी पर्यंत येऊ शकत होती.
सध्या रात्रीचे ८.३० वाजले होते मग आरोग्य सेवक यांनी म्हटले की पुढील ७ किमीचे अंतर 2-व्हीलरने करावे लागेल . तर आणखी वेळ न घालवता लगेच तयारी करून बोटनफुंडी करीत निघालेत.घनदाट जंगल, पायवाट रोड मध्ये नाले, पडलेली झाडे असा प्रवास करून बोटनफुंडी पर्यंत येऊन मातेला रुग्ण वाहिकेच्या साहाय्याने लोक बिरादरी प्रकल्प हेमलकसा येथे भर्ती करण्याकरीत नेण्यात आले.परंतु तेथील कर्मचारी मातेला सेवा देण्यास तयार नव्हते , परंतू सोबत असलेल्या आरोग्य सेविकेनी आपले मनोबल कमी न करता त्यांना विनंती करून मातेला रुग्णालयात घेण्यास मनविले व मातेची प्रसूती होई पर्यंत त्या तिथेच सोबत होत्या ,मातेची सोनोग्राफी केली असता गर्भातील बाळ मातेच्या गर्भातच संडास केल्याचे कडले व नाळ बाळाच्या गळ्यात अडकलेली होती. तरी परंतु योग्य रित्या प्रसूती करून मातेला व तिच्या बाळाला जीवन दान देण्याचं अमूल्य कार्य आरोग्य सेविकेनी केलं. एकंदरीत सर्वांना आप-पाल्य घरी जाण्यास ११ ते ११.३० वाजले.
सदर बाळाचे जन्मतः वजन १३४७ GM असून ते कमी वजनाचे जन्मास आले. सध्या ते LBPH रुग्णालयामध्ये आहे.
आरोग्य सेविका व त्यांच्या चमुला (ग्रुप) सलाम ✋🏻✋🏻🙏🏻
Maharashtra News Media सच की आवाज