*कन्हान येथे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जयंती निमित्य पत्रकार दिवस थटात साजरा*
*विविध संघटन तर्फे कार्यक्रमाचे आयोजन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान येथे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जयंती निमित्य पत्रकार दिवस विविध संघटन तर्फे थटात साजरा करण्यात आला .

ग्रामीण पत्रकार संघ कन्हान
कन्हान – आद्य “दर्पण ” मराठी वृत्तपत्राचे दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन ग्रामिण पत्रकार संघ कन्हान च्या वतीने पत्रकार दिवस म्हणुन थटात साजरा करण्यात आला.
मराठी वृत्तपत्राचे दर्पणकार व पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्य ग्रामिण पत्रकार संघ कन्हान च्या वतीने बुधवार दिनांक ६ जानेवारी ला तारसा रोड येथील कार्यालयात ग्रामिण पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष मोतीराम रहाटे, कन्हान अध्यक्ष रमेश गोळघाटे, कार्याध्यक्ष अजय त्रिवेदी यांच्या शुभहस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. जेष्ठ पत्रकार अजय त्रिवेदी हयांनी आद्य वृत्तपत्र दर्पण व दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जीवनाच्या कार्या विषयी मार्गदर्शन केले. याप्रसंगी पत्रकार मोतीराम रहाटे, अजय त्रिवेदी, रमेश गोळघाटे, एन एस मालविये सर, कमल सिंह यादव, सुनिल सरोदे, शांताराम जळते, रविंद्र दुपारे, गणेश खोब्रागडे, रोहीत मानवटकर, ऋृषभ बावनकर आदींना पुष्प व भेट वस्तु देऊन सत्कार करण्यात आल्याने बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती पत्रकार दिवस म्हणुन थटात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्र संचालन सुनिल सरोदे यांनी केले तर आभार ऋृषभ बावनकर यांनी व्यकत केले .
कन्हान शहर विकास मंच

कन्हान : – आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जयंती चे औचित्यसाधुन गांधी चौक कन्हान येथे कन्हान विकास मंच च्या वतीने कार्यक्रम आयोजित करुन व कार्यक्रमासह पत्रकारांचा सत्कार करून दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती पत्रकार दिन म्हणुन थटात साजरी करण्यात आली.
बुधवार दिनांक ६ जानेवारी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्य कन्हान शहर विकास मंच च्या वतीने गांधी चौक कन्हान येथे ग्रामीण पत्रकार संघा चे जिल्हा उपाध्यक्ष मोतीराम रहाटे, कन्हानचे अध्यक्ष रमेश गोळघाटे, कार्याध्यक्ष अजय त्रिवेदी, सचिव सुनिल सरोदे, मराठी पत्रकार संघ कन्हान अध्यक्ष सुर्यभान फरकाडे, सचिव सतीश घारड, कन्हान शहर विकास मंच अध्यक्ष प्रविण गोडे यांचा शुभ हस्ते दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा प्रतिमेस पुष्पहार माल्यार्पण करुन व विनम्र अभिवादन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. याप्रसंगी मोतीराम रहाटे, रमेश गोळघाटे, अजय त्रिवेदी, मार्गदर्शक चंद्रकुमार चौकस, कन्हान वार्ता चे मुख्य संपादक मोहम्मद अली आझाद, पौर्णिमा दुबे आदींनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जिवनावर मार्गदर्शन केले. त्यानंतर ग्रामिण पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष मोतीराम रहाटे, ग्रामीण पत्रकार संघ कन्हान चे अध्यक्ष रमेश गोळघाटे, कार्याध्यक्ष अजय त्रिवेदी, कमलसिंह यादव, सुनिल सरोदे, रविंद्र दुपारे, गणेश खोब्रागडे, रोहीत मानवटकर, ऋृषभ बावनकर, मराठी पत्रकार संघाचे सुर्यभान फरकाडे, सतिश घारड, चंद्रकुमार चौकसे, धनंजय कापसीकर, विवेक पाटील, अनिल जाधव, जयंत कुंभलकर, प्रकाश तिवारी, भारत पगारे आदींना कन्हान शहर मंच च्या पदाधिकार्यांनी पुष्प गुच्छ, डॉयरी, पेन देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित सर्वांना अल्पोहार वितरीत करुन पत्रकार दिवस थटात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्र संचालन मंच सदस्य अखिलेश मेश्राम यांनी केले तर आभार मंच महिला सदस्य सुषमा मस्के यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्विते करिता कन्हान शहर विकास मंच अध्यक्ष प्रविण गोडे, उपाध्यक्ष ऋृषभ बावनकर, सचिव प्रदीप बावने, महा सचिव संजय रंगारी, हरीओम प्रकाश नारायण, प्रविण माने, सतीश ऊके, मनिष शंभरकर, मुकेश गंगराज, अली भाई, सुषमा मस्के, वैशाली खंडार, शाहरुख खान, सोनु खोब्रागडे, जाॅकी मानकर, प्रकाश कुर्वे सह अनेक मंच पदाधिकारी व सदस्यांनी सहकार्य केले.
सरपंचा सुनिता मेश्राम व्दारे पत्रकार दिनी पत्रकारांचा सत्कार
कन्हान – दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती पत्रकार दिनाचे औचित्य साधुन टेकाडी ग्रा प सरपंचा सुनिताताई मेश्राम व मित्र परिवार व्दारे कन्हान च्या पत्रकारांचा सत्कार करून पत्रकार दिन साजरा करण्यात आला.
दि.६ जानेवारी २०२१ ला पत्रकार दिन, मराठी वृत्तपत्राचे दर्पणकार व पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधुन ग्राम पंचायत टेकाडीच्या सरपंचा सुनिताताई मेश्राम व मित्र परिवार व्दारे वेकोलि नविन वसाहत टेकाडी येथे सरपंचा सुनिताताई मेश्राम व पुथ्वीराज मेश्राम यांच्या हस्ते ग्रामिण पत्रकार संघ जिल्हा उपाध्यक्ष मोतीराम रहाटे, कन्हान अध्यक्ष रमेश गोळघाटे, कार्याध्यक्ष अज य त्रिवेदी, मार्गदर्शक एन एस मालविये सर, उपाध्यक्ष कमलसिंह यादव, सचिव सुनिल सरोदे, कोषाध्यक्ष रविंद्र दुपारे, सदस्य शांताराम जळते, गणेश खोब्रागडे, रोहीत मानवटकर, ऋृषभ बावनकर, मराठी पत्रकार संघ कन्हान अध्यक्ष सुर्यभान फरकाडे, सतिश घारड , चंद्रकुमार चौकसे, धनंजय कापसीकर, किशोर वासाडे , अनिल जाधव, जयंत कुंभलकर, प्रकाश तिवारी आदी पत्रकारांचा पुष्प गुच्छ, भेट म्हणुन कव्हर फॉईल देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वि तेकरिता ग्रा प सदस्या सिधुं सातपैसे, सुरेखा काबंळे, विनोद गडपायले, प्रतिक, स्वाती, अंकुश मेश्राम आदी ने सहकार्य केले. स्नेह भोजनाने कार्यक्रमाची सांगता करून पत्रकार दिनी पत्रकारांचा सत्कार करून पत्रकार दिन थाटात साजरा करण्यात आला.
महिला मंच कन्हान
महिला मंच कन्हान च्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त सर्व पत्रकारांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला असुन कन्हान महिला मंच च्या अध्यक्षा नीतू तिवारी यांनी शहरातील सर्व पत्रकारांना कन्हान-पिपरी नगरपरिषदेच्या प्रमुख करुणा अष्टणकर आणि प्रमुख पाहुणे म्हणून जोशीला उके यांचा उपस्थिति मध्ये सर्व पत्रकारांना पुष्प गुच्छ देऊन पत्रकार दिना च्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात इंदिरा कुर्मी, सुषमा मस्के, वैशाली खंडार. पौर्णिमा दुबे, सुनीता दुबे, माया तिवारी, सोफिया शेख, उर्मिला तितारमारे, उर्मिला रॉय, शारदा दुबे, सरोज तिवारी, अंजू जाधव, मीना कंबे, मन्सारी रॉय, सुजाता नारणावारे, उषा पोटभरे यांच्या सह अनेक महिला उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज