Breaking News

*पतंगाचा मांजा विकणारे दुकानदार, पुरवठादार आणि वापर करणारे यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे मा. उच्च न्यायालय औरंगाबाद यांचे आदेश* *चायना/नायलॉन मांजावर मोठी कार्रवाई होणार*

*पतंगाचा मांजा विकणारे दुकानदार, पुरवठादार आणि वापर करणारे यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे मा. उच्च न्यायालय औरंगाबाद यांचे आदेश*

*चायना/नायलॉन मांजावर मोठी कार्रवाई होणार*

विशेष प्रतिनिधि – प्रशांत भोयर

औरंगाबाद – सर्वसाधारण नायलॉन मांजा या नावाने परिचित असलेल्या प्लॅस्टिक किंवा कृत्रिम रितीने बनविलेल्या माज्यात साधारण ४०-४५ किलोपर्यंत वजन पेलण्याची ताकद आहे त्यामुळे पक्षी, प्राणी व मानव जिवितांस इजा पोहचली जाते, काही प्रसंगी त्या इजा प्राणघातक ठरतात,
पतंगासह तुटलेल्या नायलॉन मांजा बर्‍याच ठिकाणी झाडावर, विधुत तारांवर तसेच जमीनवर तर नाल्यात आढळून येतो. सदर नायलॉन मांजाचे लवकर विघटन होत नसल्याने अधिकच घातक ठरतो.


ह्या काळात बरेच पक्षी विदेशी आपल्या कडे स्थालांतर करुन येतात व इतर पक्ष्यांचीही चांगली चहलपहल असल्याने झाडावर व विघुत तारांवर अडकलेल्या मांज्यात अनेक पक्षी मोठ्या प्रमाणात अडकून त्यांना ईजा पोहचते व मुत्युमुखी पडतात. तर मांज्यानी विजेच्या तारेवर अडकलेल्या पक्ष्यां मुळे दोन तारात संपर्क येवून ठिणग्या पडुन विजप्रवाह खंडीत होतो. जमीनीवर पडलेल्या मांज्या गाय, बकरी सह वन्यजीव प्राण्यांच्या अवधाने खाद्य सेवन केल्यामुळे पचन क्रियेला त्रास होतो. मुत्यु पण होऊ शकतो. राहीलेला मांज्या गटारे व नाल्यासारख्या नैसर्गिक प्रवाहात अडथळे निर्माण करतात.
एकंदरीत मांजा घातक सिद्ध होतो. त्यामुळे नागरिकांनी स्वतः याचा वापर टाळावा व आपल्या पाल्याला पण हताळु देवु नका.

*महाराष्ट्रात शासनाने सर्व जिल्हयातील घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी तसेच साठवणूकदार यांना नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक करणार्‍या वर पर्यावरण (संरक्षण) कायदा, १९८६ चे कलम ५ व १५ आणि महाराष्ट्र शासन पर्यावरण मंत्रालय मुंबई प्रधान सचिव (पर्यावरण) यांचे आदेश क्रमांक /CRT- 2015/CR-37/T.C.2 दिनांक ३०/३/२०१५ नुसार कारवाई होऊ शकते.*
*रोहन भाटे*
*मा मानद वन्यजीव रक्षक*
तथा
*वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो सदस्य*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …