Breaking News

*सिहोरा घाटा वरुन अवैध रेती चोरून नेणार्या ट्रॅक्टर ला कन्हान पोलिसांनी पकडले* *कारवाईत एकुण पाच लाख तीन हजारांचा मुद्देमाल केला जप्त*

*सिहोरा घाटा वरुन अवैध रेती चोरून नेणार्या ट्रॅक्टर ला कन्हान पोलिसांनी पकडले*

*कारवाईत एकुण पाच लाख तीन हजारांचा मुद्देमाल केला जप्त*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन च्या हदीत दिवसन दिवस अवैध रेतीचे उत्खनन वाढत असुन कन्हान नदीच्या सिहोरा घाटा वरुन रेती चोरी करून अवैध वाहतुक करणार्‍या बिना नंबर ट्रॅक्टर ट्रॉली ला कन्हान पोलीसांनी रात्री च्या वेळी ग्रस्तवर असतांना पकडुन आरोपी ट्रॅक्टर चालक जवळुन पाच लाख तीन हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करून कारवाई करण्यात आली.
कन्हान पोलीस स्टेशन चे सहायक पोलीस उप निरिक्षक महादेव सुरजुसे सह पोलीस कर्मचार्यांनी रात्री ग्रस्तवर असतांना कन्हान नदीच्या सिहोरा रेती घाटा वरुन बिना नबंर ट्रॅक्टर ट्रालीत चोरीच्या रेतीची अवैध वाहतुक करते वेळी पांधन रोड हनुमान नगर कन्हान येथे पकडुन फिर्यादी सचिन सलामे यांच्या तक्रारा वरून कलम ३७९ , १०९ भादंवी नुसार गुन्हा नोंद करून ट्रॅक्टर चालक रोशन सेवर लोंढे वय २८ वर्ष राहणार पंचशील नगर सत्रापुर कन्हान यास अटक करण्यात आली . कन्हान पोलीसांनी आरोपी ट्रॅक्टर चालक जवळुन एक ब्रास रेती किंमत ३,००० रूपए व बिना नबंर ट्रॅक्टर, ट्राली किंमत ५ लाख रूपये असा एकुण ५ लाख ३ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करुन ही कारवाई करण्यात आली . ही कारवाई कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरिक्षक अरूण त्रिपाठी यांचा मार्गदर्शनात , सहायक पोलीस उपनिरिक्षक महादेव सुरजुसे, जोसेफ राव, मुकेश वाघाडे, संजु बदोरिया, जितेन्द्र गावंडे, साचिन सलामे हयांनी केली . या प्रकरणाचा पुढील तपास कन्हान पोलीस करीत आहे .

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …