Breaking News

*तेजस संस्था कामठी च्या वतीने कन्हान नदी शांती घाट रस्त्याकरिता चालवला स्वछता अभियान* *तेजस संस्थेच्या ११३ प्रशिक्षणार्थ्यांनी श्रमदान करून तयार केला व्यवस्थित रस्ता.*

*तेजस संस्था कामठी च्या वतीने कन्हान नदी शांती घाट रस्त्याकरिता चालवला स्वछता अभियान*

*तेजस संस्थेच्या ११३ प्रशिक्षणार्थ्यांनी श्रमदान करून तयार केला व्यवस्थित रस्ता.*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – तेजस बहुउद्देशीय संस्था कामठी च्या वतीने तेजस प्रशिक्षणार्थ्यांनी स्वच्छता अभियान चालवुन कन्हान नदी शांतीघाट रस्त्यावर असलेली रेती, माती व वाढलेली काटेरी झाड़े – झुडुपे कापुन रस्त्याची साफ सफाई करून अंतिम संस्कार व राख विसर्जना करिता येणार्या – जाणार्या नागरिकांन करिता श्रमदानाने कन्हान नदी शांती घाटाचा रस्ता स्वच्छ व व्यवस्थित केला .
कन्हान शांती घाटावर कामठी व कन्हान परिसरातील मृतदेहा चा अंतिम संस्कार व राख विसर्जन कन्हान नदीच्या शांती घाटावर करण्यात येतो . यावर्षी नदीला महापुर आल्याने नदी घाटावर रेती, माती जमा होऊन , काटेरी झाड़े – झुडुपे वाढुन रस्ता अंत्यत कठीण झाल्याने नदी घाटावर येणार्णा – जाणार्या नागरिकांना भंयकर अडचणीचा सामना करावा असल्याची दखल घेत तेजस बहुउद्देशीय संस्था कामठी चे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर अरगुलेवार यांनी बुधवार दिनांक. २८/१०/२०२० ला तहसीलदार कामठी यांना या रस्त्याची साफसफाई करून अजनी रेल्वे क्रासिंग पासुन कन्हान नदी पुलापर्यंत महामार्गा वरील विद्युत लाईट सुरू करण्याची मागणी एका निवेदना द्वारे केली होती.

परंतु दोन महिने लोटुन सुध्दा प्रशासनाने कुठल्याही प्रकारची कार्यवाही नाही केली. तसेच अंतिम संस्कार व राख विसर्जना करिता येणार्णा – जाणार्णा नागरिकांना महामार्गा पासुन नदीत रस्त्याने जातांना काटेरी झाड़े – झुडपा चे काटे रूतुन पायवाटे ने भंयकर त्रास सहन करावा लागत असल्याची दखल घेऊन तेजस संस्थेने समाज सेवेचे कर्तव्याने शुक्रवार दिनांक ८/१/२०२१ ला पहाटे सकाळी ५.३० ते १०:०० वाजता पर्यंत ११३ तेजस प्रशिक्षणार्थ्यांनी श्नमदान करित कन्हान नदी पुलाच्या महामार्गा पासुन नदी पर्यंत रस्त्यावरील बाबळीचे मोठ मोठी झाड़े – झुडपे कापुन दुर फेकुन रेती, माती सपाट करून येणार्या – जाणार्या नागरिकांन करिता व्यवस्थित रस्ता तयार केला.

नदी घाट रस्ता तयार करण्यास स्वच्छता अभियान राबविण्यास तेजस बहु उद्देशीय संस्था व प्रशिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर अरगुलेवार, उपाध्यक्ष देवीदास पेटारे, मार्गदर्शक विनोद कास्त्री, रहीम शेख, नरेश शिंदे, मिस्बा हऊर रहमान व ११३ प्रशिक्षणार्थानी श्रमदान व मौलिकाचे कार्य करून खर्या समाजसेवेचे आदर्श कार्य केले. यावेळी शांती घाटावर किर्याक्रमास आलेले बिल्लु यादव व समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित असुन यादव परिवाराने संस्थेच्या स्वच्छता अभियानाचे कौतुक करित अभिनंदन केले. “तेजस संस्थेचे कार्य सदैव मानवते च्या हितार्थ” अशी संस्था अध्यक्ष चंद्रशेखर अरगुलेवार हयानी मंनक्षा व्यकत केली .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …