Breaking News

*भंडारा जिल्हा रूग्णालयाची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली पाहणी* *दुर्लक्ष करणार्‍यांनवर कठोर कारवाई- मुख्यमंत्री ठाकरे*

*भंडारा जिल्हा रूग्णालयाची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली पाहणी*

*दुर्लक्ष करणार्‍यांनवर कठोर कारवाई- मुख्यमंत्री ठाकरे*

भंडारा विशेष प्रतिनिधी

भंडारा – शनिवारी पहाटे भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात घडलेली दुदैवी घटना राज्य सरकारला खळबळून जाग आणणारी ठरली. या घटनेनंतर राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमंध्ये अग्निशमन यंत्रे बसविली जाणार आहे. याशिवाय दर तीन वर्षांनी या अग्निशमन सिस्टीमचे ऑडीट केले जाणार आहे. लवकरच हा मुद्दा कॅबिनेटसमोर येऊन मंजुरी दिली जाणार आहे. उशिरा का होईना शासनाला जाग आली. परंतु, त्यासाठी १० निष्पाप बाळांना जीव गमवावा लागला हे दुर्देव.*

*रविवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे जिल्ह्याच्या दौर्‍यावर आलेत,प्रथम त्यांनी भोजापूर येथील पिडीत कुटूंबियांची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर जिल्हा सामान्य रूग्णालय येथे पोहचून घटनास्थळाची पाहणी करुन माहीती घेतली. यावेळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले. आमदार नरेंद्र भोंडेकर. आमदार राजू कारेमोरे. प्रा.जोगेंद्र कवाडे , जिल्हा सामान्य रुग्नालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ प्रमोद खंडाते. भंडाराचे पोलिस अधीक्षक वसंत जाधव. जिल्हाधिकारी संदीप कदम. यांच्यासह अन्य नेते मंडळी व अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी प्रसार माध्यमांशी संवाद साधत मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रीया दिल्या.*

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …