Breaking News

*कोळसा खदान नंबर ६ येथे एका अल्पवयीन मुलीवर विनयभंग* *कन्हान पोलीसांनी आरोपी वर पोस्को चा गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरू केला*

*कोळसा खदान नंबर ६ येथे एका अल्पवयीन मुलीवर विनयभंग*

*कन्हान पोलीसांनी आरोपी वर पोस्को चा गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरू केला*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर*

कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन च्या हदीत कोळसा खदान नंबर ६ येथे एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर विनयभंग केल्याची घटना समोर आल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी पिडिती च्या रिपोर्ट वरुन आरोपी विरु अशोक टेकाम वय अंदाजे २३ वर्ष राहणार कोळसा खदान नंबर ४ यांचावर पोस्को चा गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरू केला आहे।

प्राप्त माहिती प्रमाणे पिडित फिर्यादी व आरोपी विरु अशोक टेकाम हे दोन्ही कोळसा खदान चे रहिवासी असुन गेल्या तीन वर्षापासुन मैत्रीचे व प्रेमाचे संबंध असुन त्यांचेतील प्रेमसंबंधाबाबत पिडितेचे घरी समजले च्या कारणावरुन फिर्यादी ने दिनांक ०२-०१-२०२१ रोजी रात्री ०८:०० वाजता च्या सुमारास उंदीर मारण्याचे औषध प्राशन केले होते . पिडित फिर्यादी ही अल्पवयीन असल्याचा फायदा घेवुन आरोपी विरु अशोक टेकाम वय अंदाजे २३ वर्ष राहणार कोळसा खदान नंबर ४ ने खंदान नंबर ६ येथे रुमवर पिडिता हिच्यासोबत एकदा तिच्या मर्जीने शारीरिक संबंध केले . अश्या पिडित फिर्यादी च्या रिपोर्ट वरुन कन्हान पोलीसांनी आरोपी विरु अशोक टेकाम वय अंदाजे २३ वर्ष राहणार कोळसा खदान नंबर ४ याचा वर अपराध क्रमांक ०५/२०२१ ने गुन्हा नोंद करुन कलम ३७६ भा.द.वी सह कलम ४ पोस्को बाल लैंगिक प्रतीबंधक कायदा २०१२ कलम भा.द.वी ने गुन्हा दाखल कर पोलीस उपविभागीय अधिकारी मुक्तार बागवान व पोलीस निरीक्षक अरुण त्रिपाठी यांचा मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक नंदा पाटील पुढील तपास करीत आहे .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …