*बोरगांव शिवारात वाघाचा हैदोस दोघांवर झडप घालण्याचा प्रयत्न*
वरोरा प्रतिनिधी -मूजम्मील शेख
वरोरा – आज बोरगांव शि येथील रामपूर बीट अंतर्गत येणाऱ्या जंगला च्या लगत श्री मंगेश नन्नावरे आणि राजेंद्र नन्नावरे हे आपल्या शेतात काम करीत असताना वाघाने त्यांच्यावर झडप घातली . सुदैवाने या हमल्यात ते बचावले.यामध्ये ते पळताना किरकोळ जखमी झाले . वन विभागाच्या वन परिक्षेत्र अधिकारी श्री राठोड साहेब ह्यांना या संदर्भात माहिती देताच ते लगेच घटनास्थळी पोहोचले व शिवारात फटाके वाजवून मोक्का चौकशी केली .
शिवारातील शेतकऱ्या चे नुसार साधारण दोन पट्टेदार वाघ या क्षेत्रात रोज दिसत आहे तरी वनविभागाने कुठलीही प्राणहानी सारखी घटना घडण्या अगोदर योग्य तो बंदोबस्त करावा अशी मागणी समस्त बोरगांव शि येथील, शेतकरी, गावकरी करीत आहे.
या वेळी वन व्यवस्थापन समिती, बोरगांव शि चे पदाधिकारी तसेच विजेंद्र नन्नावरे तालुकाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग वरोरा राष्ट्रवादी काँगेस तसेच गावातील गावकरी उपस्थित होते.