शासनाचे नियम शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यास अधिकारी सक्षम ठरतील का? – शेतकऱ्यांचा प्रश्न!

*पिकविम्याचे पैसे देण्यास कंपनीचा नकार : शेतकरी हतबल.*
प्रतिनिधि – प्रदिप घुमडवार (कुही)
*शासन नागरिक व शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आखत असतात मात्र त्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन तोकडे पडत असताना अधिकारी सक्षम ठरतील का?असा प्रश्न तालुक्यातील शेतकरी करीत आहेत. शेतकरी दरवर्षी पीककर्ज राष्ट्रीय बँकेतून घेत असतो.हे पीक कर्ज घेताना शासनाच्या आदेशानुसार बँक शेतकऱ्याकडून अगोदरच पीक विमा म्हणून त्याच कर्जातून कपात करीत असतात.जर शेतकऱ्याच्या पीकांचे अस्मानी किंवा सुल्तानी संकट येऊन पिकांचे नुकसान झाले तर पीक विमा म्हणून त्या शेतकऱ्याला पिकांची भरपाई देणे गरजेचे असते.परंतु येथील विमा कंपनी शेतकऱ्यांना नानाविध अटी घालून भरपाई देण्यास टाळाटाळ करतात.तेव्हा मात्र शेतकरी हतबल होतो, असे चित्र सध्या तालुक्यात सर्वत्र दिसत आहे.*
*विविध बँकेने गरजू आणि गरजवंत शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले त्यात त्यांच्या कर्जातून पीक विम्याची हमी घेत शासनाच्या आदेशानुसार पीक विम्याचे पैसे कपात केले त्यासाठी हेक्टरी ४३५०० रुपये विमा काढण्यासाठी भात पीका ला ४३५०० रुपयाकरिता ८७०/- रुपये, सोयाबीन पिकाकरिता हेक्टरी ४३००० रुपये या साठी ८६० रुपये,कापूस या पीकासाठी विमा संरक्षण हेक्टरी ४३००० रुपयासाठी २१५० रुपये असा विमा काढण्यात आला.* *शेतकऱ्यांची ईच्छा नसतांनाही बँकेने पिक कर्जातुन पिक विम्याची रक्कम वसुल करुन विमा कंपनीला दिलासा दिला.मागील काही दिवसापासून तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे.त्यातच दि.६/०९/२०१९ ला तालुक्यात अतिवृष्टी झाली त्यात तालुक्यातील जवळपास ६५ टक्के पिके नष्ट झाली त्यातही बऱ्याच शेतकऱ्यांनी पिक कर्ज घेतल्यामुळे बँकेने पिक विमा काढून घेतला त्यात शासनाने दिलेल्या बजाज अलाईंस कंपनीला लाखो, करोडो रुपयांचा महसूल गोळा करून दिला. मात्र आता निसर्गाने शेतकऱ्यांवर अवकृपा केली व अतिवृष्टी ने शेतकऱ्यांचे उभे पीकच नष्ट झाले.अशा वेळेस शेतकऱ्यांना हक्काचा पिक विमा मिळणे अपेक्षित असतांना कंपनीने शेतकऱ्यांना जाचक अटी लावत बळीराजाची बोळवन करीत त्यांना चोवीस तासांच्या आत 18002095959 या टोल फ्री क्रमांकावर फोन करुन रजिस्ट्रेशन करा. मुख्य म्हणजे हा नंबर अशिक्षित व अडाणी शेतकऱ्यांकडे कुठुन असणार व असला ही तरी कित्येक शेतकऱ्यांनी या नंबर वर संर्पक साधला असता प्रतिसाद मिळत नसल्याचे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले.*
*जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांना हक्काच्या काढलेल्या विम्यापासुन वंचीत राहण्याची वेळ जर शेतकऱ्यांवर येत असेल तर या देशाचे दुर्दैव कोणते अशी म्हणण्याची वेळ बळीराजावर आली आहे.येऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकीच्या वा-याने विविध पक्षाचे नेते गुडघ्याला बाशिंग बांधून अपक्ष उमेदवारीच्या तयारीत आहेत.हे नेते आपल्याला भविष्यात उमेदवार व्हायचे म्हणून नुसते पेपरच्या माध्यमातून ओला दुष्काळ जाहीर करा अशा आशयाचे निवेदन देवून प्रसिद्धीच्या झोतात येण्याचा प्रयत्न करीत आहेत.मात्र पिक विम्यापासुन होणारी होरपळ व ज्यांच्या शेतीचे व घरांचे संसारोपयोगी वस्तूंंचे नुकसान झाले त्याकडे कोणत्याही नेत्याला लक्ष द्यायला वेळ नसल्याचे चित्र तालुक्यात पाहावयास मिळत आहे. तेव्हा ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा काढला त्यांना त्वरित पिक विम्याची विना अट रक्कम देण्यात यावी अशी शेतकऱ्यांकडुन मागणी होत आहे.*

*प्रतिक्रिया
1) मी माझ्या शेतकऱ्यांसोबत आहे येथील अधिका-यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहुन त्यांना त्यांच्या झालेल्या नुकसान भरपाईचे पैसे मिळवुन द्यावे त्यासाठी मी पालकमंत्री साहेबांची भेट घेवून तोडगा काढण्याचा प्रयत्न करीत आहे.*
-सुनील जुवार,भा.ज.पा. तालुका अध्यक्ष
*2) शासनाने पिककर्ज देतांना शेतकऱ्यांकडुन पिकविमा काढून घेतला आणि आता निसर्गाच्या अवकृपेने शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले तेव्हा रीतसर त्यांची नुकसान भरपाई द्यावी अन्यथा वंचीत बहुजन आघाडी च्या माध्यमातून ति्व आंदोलन छेडण्यात येईल*
-राजेंद्र मेश्राम उमरेड विधान सभा प्रभारी वंचीत बहुजन आघाडी
*3 दि.६ सप्टेंबरला झालेल्या अतिवृष्टीमुळे नदीकाठावरील शेतकऱ्यांचे उभे पीक नष्ट झाले.या पिकांचा त्वरित सर्व्हे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी.तसेच पिकविम्याचे पैसे विनाअट देण्यात यावे,अन्यथा शिवसेना विमा कंपनीच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा शिवसेनेचे ज्येष्ठ तथा माजी जिल्हाप्रमुख पांडुरंग बुराडे यांनी दिला आहे.*
Maharashtra News Media सच की आवाज