*वरोरा येथे शिवसेना कार्यकर्ता मेळावा व आढावा बैठक*

*ना. एकनाथ शिंदे यांची उपस्थिती*
वरोरा प्रतिनिधि – जुबेर शेख
वरोरा – राज्यात सुरु असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवसेना नेते मैदानात उतरले असून राज्याचे नगर विकास मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात शिवसेना कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थिती दर्शविली. या मेळाव्याला मार्गदर्शन करताना त्यांनी शिवसैनिकांना अधिक संख्येने ग्रामपंचायत सदस्य निवडून आणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गिफ्ट देण्याचे आवाहन केले. आगामी काळात सरपंचपदाच्या निवडणुकीत मुख्यमंत्र्याच्या आदेशानुसार काम करा असे सांगत शिवसेनेला तळागाळात पोचण्यासाठी ग्रामपंचायत निवडणूक जिंकणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन यावेळी शिंदे यांनी केले. चंद्रपूर जिल्ह्यासाठी दोन रुग्णवाहिका देणार असून ग्रामीण क्षेत्रांमध्ये आरो फिल्टर देण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.

आचारसंहिता संपल्यानंतर क्षेत्रासाठी सार्वजनिक बांधकामासाठी निधी कमी पडू देणार नाही असे सूचक वक्तव्य त्यांनी केले. जिल्ह्यात शिवसेनेच्या पदरात आमदार असताना सुद्धा स्वतःच्या हितासाठी दुसऱ्या पक्षात प्रवेश केल्याने दरवेळेस शिवसैनिकांना सांभाळण्यासाठी पदाधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते त्यामुळे येणाऱ्या काळात अशा लोकांना पक्षाने तिकीट देऊ नये असे मत शिवसेना चंद्रपूर जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी चंद्रपूर जिल्ह्याचे पूर्व विदर्भ समन्वयक प्रकाश वाघ, चंद्रपूर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख प्रशांत दादा कदम, वरोरा विधानसभा क्षेत्र संपर्कप्रमुख संजय काळे, चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख नितीन मते व संदीप गिरे, मुकेश जिवतोडे मनीष जेठाणी व हजारो शिवसैनिक उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज