*पेरमिली येथे रेझिंग डे अनुषंगाने “व्यसनमुक्ती रॅली” चे आयोजन*

पेरमिली प्रतिनिधि – श्रीकांत दुर्ग
पेरमिली – 6/ 1 /2021 रोजी उप पोस्टे पेरमिली मार्फत रेझिंग डे अनुषंगाने “व्यसनमुक्ती रॅली” चे आयोजन करण्यात आले होते यामध्ये पेरमिली मधील महिला बचत गटाच्या सर्व सदस्य तसेच गावातील युवक असे एकूण 180 ते 200 जणांनी उस्फुर्त सहभाग घेतला. व्यसनमुक्तीचे बॅनर फडकावून तसेच व्यसनमुक्तीच्या घोषणा देऊन जनजागृती करण्यात आली.

अनेक महिलांनी व्यसनमुक्तीच्या संदर्भात आपले मत मांडले. पीएसआय धनंजय पाटील यांनी रॅलीला संबोधन करताना व्यसनामुळे होणारी हानी वाहवत जाणारी युवापिढी यावर प्रतिबंधात्मक उपाययोजनेची माहिती दिलीदिली तसेच “पोलीस तुमचा भाऊ” ही संकल्पना मांडून सर्व महिलांनी व्यसनमुक्तीच्या लढ्यात अग्रेसर राहण्यासाठी प्रेरणा दिली. उपस्थित सर्वांना चहापाणी देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Maharashtra News Media सच की आवाज