Breaking News

*अयोध्या येथे श्रीराम मंदीर निर्माण करण्याकरीता निधी समर्पण कार्यालयाचे उद्घाटन*

*अयोध्या येथे श्रीराम मंदीर निर्माण करण्याकरीता निधी समर्पण कार्यालयाचे उद्घाटन*


नरखेड तालुका प्रतिनिधी – श्रीकांत मालधुरे

नरखेड: श्री राम जन्मभूमी अयोध्या येथे मंदिर निर्माण करण्याकरीता येथे कार्यालय गृहसंपर्क व ग्रामसंपर्क राबविण्याकरीता कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यास द्वारा भव्य श्रीराम मंदिर निर्माण करण्यात येत आहे. त्याकरीता स्थानिक लोकांकडून निधी मिळावा, गृहसंपर्क वाढवावा, ग्रामीण भागात अयोध्या निर्माण होत असलेल्या श्रीराम मंदिराच्या बांधकामाकरीता निधी गोळा करण्याचे काम करण्यासाठी शहरात गांधी चौक येथे कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले. या कार्यालयाचे उद्घाटन सु.श्री. अर्पिता दिदी मानसभारती, ह.भ.प. पळसरामजी कळंबे महाराज, ह.भ.प. ठाकरे महाराज यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी अर्पिता दिदि व कळंबे महाराज यांचे निधी समर्पणाच्या उद्देशाबाबत समर्पक मार्गदशन झाले. त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनात श्रीरामाचे भव्य मंदिर निर्माण करणे म्हणजे तळागळातील सर्व समाजाला प्रभु रामासोबत जोडणे होय. यासाठी हे अभियान सर्वस्तरात यशस्वी करण्याचे आव्हानही महाराजांनी केले. यावेळी प्रस्ताविक रामेश्वर शेंद्रे तर संचालन गुणवंत गिरडकर यांनी केले. न.प. उपाध्यक्ष अजय बालपांडे, उकेश चव्हाण, मनोज कोरडे, संजय कामडे, भारत अरमरकर, प्रमोद टोनपे, सुरेश शेंदे्र, राजु कुर्वे, हरिकांत माळोदे, सचिन चरडे, अशोक वेरूळकर, योगेश मांडवेकर, जयदीप गोहडे, गजेन्द्र हवाले, मोवाडचे सुरेश पांढरकर,श्रीकांत मालधुरे,दिनेश पांडे,राहूल होले, प्रज्वल खंडारे, विशाल रेवतकर त्याच प्रमाणे सर्व तालुक्यातील रामभक्तांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …