Breaking News

*कन्हान व कामठी येथे राजमाता जिजाऊ साहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती तसेच राष्ट्रीय युवा दिवस थटात साजरा* *विविध संघटन तर्फे कार्यक्रमाचे आयोजन*

*कन्हान व कामठी येथे राजमाता जिजाऊ साहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती तसेच राष्ट्रीय युवा दिवस थटात साजरा*

*विविध संघटन तर्फे कार्यक्रमाचे आयोजन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान व कामठी शहर येथे विविध संघटनाच्या वतीने राजमाता जिजाऊ साहेब व स्वामी विवेकानंद यांचा जयंती तसेच राष्ट्रीय युवा दिवस निमित्त ठिक – ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करुन मोठ्या उत्साहाने थटात साजरे करण्यात आले .

*कन्हान शहर विकास मंच*

कन्हान – राजमाता जिजाऊ साहेब व स्वामी विवेकानंद यांचा संयुक्त जयंती निमित्य कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन कन्हान – पिपरी नगर परिषद च्या प्रांगणात करण्यात आले असुन राजमाता जिजाऊ साहेब व स्वामी विवेकानंद यांचा प्रतिमेवर पुष्प हार माल्यार्पण करुन व पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत राष्ट्रीय युवा दिवस म्हणुन थटात साजरा करण्यात आला .
मंगळवार दिनांक 12 ला राजमाता जिजाऊ साहेब व स्वामी विवेकानंद यांची संयुक्त जयंती निमित्य कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन कन्हान – पिपरी नगरपरिषद च्या प्रांगणात करण्यात आले असुन कार्यक्रमात उपस्थित कन्हान शहर विकास मंच चे अध्यक्ष प्रवीण गोडे यांनी राजमाता जिजाऊ साहेब व स्वामी विवेकानंद यांचा प्रतिमेवर पुष्प हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असुन मंच महिला सदस्य सुषमा मस्के , व पौर्णिमा दुबे यांनी मार्गदर्शन केले असुन कार्यक्रमात उपस्थित सर्व मंच पदाधिकार्यांनी राजमाता जिजाऊ साहेब व स्वामी विवेकानंद यांचा प्रतिमेवर पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत राष्ट्रीय युवा दिवस म्हणुन थटात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमात कन्हान शहर विकास मंच अध्यक्ष प्रवीण गोडे , उपाध्यक्ष रुषभ बावनकर , सचिव प्रदीप बावने , संजय रंगारी , हरीओम प्रकाश नारायण , सतीश ऊके , प्रवीण माने , अखिलेश मेश्राम , सुषमा मस्के , पौर्णिमा दुबे , वैशाली खंडार सह अनेक मंच पदाधिकारी उपस्थित होते .
कार्यक्रमाचे सुत्र संचालन मंच सचिव प्रदीप बावने यांनी केले तर आभार मंच सदस्य सतीश ऊके यांनी मानले .

*कन्हान – पिपरी नगरपरिषद*

कन्हान – पिपरी नगरपरिषद च्या वतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचा जयंती तसेच राष्ट्रीय युवा दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन नगर परिषद च्या प्रांगणात करण्यात आले असुन नप नगराध्यक्षा करुणा आष्टणकर व मुख्याधिकारी गिरीश बन्नोरे यांचा शुभ हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचा प्रतिमेवर पुष्प हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता कार्यक्रमात उपस्थित सर्व नगरसेवक , नगरसेविकांनी , नगर परिषद च्या अधिकारी , व कर्मचार्यांनी राजमाता जिजाऊ साहेब व स्वामी विवेकानंद यांचा प्रतिमेवर पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन केले . यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान , विवेकानंद , हिराबाई शाळा , शिवाजी नगर , सह आदी ठिकाणी विविध प्रकाराचे वृक्ष लावुन राजमाता जिजाऊ साहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती तसेच राष्ट्रीय युवा दिवस थटात साजरा करण्यात आला .
यावेळी नप मुख्याधिकारी गिरीश बन्नोरे , नप नगराध्यक्षा करुणा आष्टणकर , उपाध्यक्ष योगेंद्र रंगारी , विरोधी पक्ष नेता राजेंन्द्र शेंदरे , नगरसेवक विनय यादव , राजेश यादव , मनिष भिवगडे , नगरसेविका गुफ तिडके , रेखा टोहणे , सुषमा चोपकर , संगीता खोब्रागडे , अनिता पाटील , वंदना कुरडकर , वर्षा लोंढे , कावडकर ताई , मनिषा चिखले , हरीष तिडके , प्रदीप बावने , निखिल रामटेके सह अनेक नप अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते .

*सात स्टार संस्था , टेकाडी*

राजमाता जिजाऊ साहेब व स्वामी विवेकानंद यांचा जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन फुले चौक टेकाडी येथे करण्यात आले असुन राजमाता जिजाऊ साहेब व स्वामी विवेकानंद यांचा प्रतिमेला हार माल्यार्पण करुन व पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करण्यात आले .
यावेळी टेकाडी ग्रामपंचायत सदस्य दिनेश चिमोटे , राजे ग्रुप कन्हान अध्यक्ष केतन भिवगडे , नेहरु युवा केंद्र नागपुर समन्वयक श्याम मस्के , समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले संस्था टेकाडी अध्यक्ष निलेश गाढवे , अजित मोहडे , सुरेंन्द्र राऊत , रविंद्र राऊत , सचिन ढोबले , सह आदी नागरिक उपस्थित होते .

*भाजपा कन्हान शहर व भाजपायुमो कांन्द्री*

भाजपा कन्हान शहर व भाजपायुमो कांन्द्री द्वारे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचा जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन नगर परिषद च्या प्रांगणात करण्यात आले असुन भाजपा पारशिवनी तालुका अध्यक्ष अतुल हजारे व भाजपा कन्हान शहर अध्यक्ष डॉ मनोहर पाठक यांनी राजमाता जिजाऊ साहेब व स्वामी विवेकानंद यांचा प्रतिमेवर पुष्प हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता सर्व भाजपा पदाधिकार्यांनी राजमाता जिजाऊ साहेब व स्वामी विवेकानंद यांचा प्रतिमेवर पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन केले . यावेळी भाजपा पारशिवनी तालुका अध्यक्ष अतुल हजारे , भाजपा कन्हान शहर अध्यक्ष डॉ.मनोहर पाठक , भाजपायुमो तालुका महामंत्री व पंचायत समिती सदस्य नरेश मेश्राम , रानु शाही, कन्हान नगरपरिषदेचे गटनेता राजेंद्र शेंद्रे, नगरसेविका सुषमा चोपकर, अनिता पाटील, संगीता खोब्रागडे , वर्षा लोंढे , वंदनाताई कुरडकर , माजी नगरसेवक अजय लोंढे ,मनोज कुरडकर, भाजपा महामंत्री अमोल साकोरे,भाजयुमो जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सौरभ पोटभरे, भाजयुमो पारशिवनी तालुका उपाध्यक्ष संकेत चकोले, भाजयुमो कान्द्री शहर अध्यक्ष लोकेश अंबाडकर, सचिन कांबडे,गणेश किरपान, भोला मंडलेकर,शुभम यादव, चंद्रकांत बावणे सह अनेक भाजपा व भाजयुमो कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

*भाजपा कामठी शहर*

भाजपा कामठी शहर द्वारे राजमाता जिजाऊ साहेब व स्वामी विवेकानंद यांचा जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन कामठी नगर परिषद येथे करण्यात आले असुन भाजपा कामठी शहर अध्यक्ष संजय कनोजिया यांनी राजमाता जिजाऊ साहेब व स्वामी विवेकानंद यांचा प्रतिमेवर पुष्प हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता महामंत्री उज्वल रायबोले , प्रतिक पडोळे , व सतीश जैस्वाल यांनी मार्गदर्शन केले . कार्यक्रमात उपस्थित सर्व भाजपा पदाधिकार्यांनी राजमाता जिजाऊ साहेब व स्वामी विवेकानंद यांचा प्रतिमेवर पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन केले .

*युवा चेतना मंच*

युवा चेतना मंच द्वारा राजमाता जिजाऊ साहेब व स्वामी विवेकानंद यांचा जयंती तसेच राष्ट्रीय युवा दिवस निमित्य विविध कार्यक्रमाचे आयोजन रनाला येथील प्रगति नगरात करण्यात आले असुन कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ संजय भाजीपाले , युवा चेतना मंच चे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप दिवटे , राष्ट्रीय उपाध्यक्ष महेश महाडीक , सनातन मित्र मंडळ चे अध्यक्ष सुधीर अपाले , शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपुर चे डॉ टोंगसे सह आदींच्या उपस्थिति मध्ये राजमाता जिजाऊ साहेब , स्वामी विवेकानंद , व श्याम तंबोली , यांचा प्रतिमेवर हार माल्यार्पण व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता जगदीश वानोडे , अध्यक्ष , युवा चेतना मंच हिंगणा , आरोग्य सेवक योगेश नासरे , रूपाली नाटकर , रोशनी फुलकर , आपातकाल सामाजिक संगठनेचे अध्यक्ष प्रमोद वानखेडे , यांचा सत्कार करण्यात आला असुन रक्त संक्रमण परिषद शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपुर च्या आश्रयाने रक्तदान शिविर कार्यक्रमाचे आयोजन करुन ३० रक्तदात्यांनी रक्तदान देत राजमाता जिजाऊ साहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती तसेच राष्ट्रीय युवा दिवस थटात साजरा करण्यात आला . कार्यक्रमाचे सुत्र संचालन पराग सपाटे यांनी केले , कार्यक्रमाची प्रस्तावना विनोद कोहळे यांनी मांडली व आभार रुपेश चकोले यांनी व्यक्त केले .
कार्यक्रम यशस्विते करिता अक्षय खोपे, बंटी पिल्ले, अमोल नागपुरे, श्रीकांत अमृतकर ,अतुल चोरघडे ,शिव कुशवाह ,डॉ .निखील अग्निहोत्री ,अशीष हिवरकर ,उमेश गिरी ,अमोल श्रावणकर, रामजी बोंढारे ,प्रवीण आगाशे, प्रीती हिवरेकर ,भावना सपाटे ,सारिका नागपुरे ,बॉबी महेंद्र ,आशुतोष नवले ,कमलाकर नवले ,अतुल ठाकरे ,अश्विनी ठाकरे ,नरेश सोरते ,हर्षवर्धन आढाऊ ,मयुर गुरव ,कुणाल सोलंकी, पंकज वर्मा ,प्रितेश खोपे ,नितीन ठाकरे ,बाल्या सपाटे, सह युवा चेतना मंच चे सदस्य , नेहरू युवा केन्द्र नागपूर, सनातन मित्र मडंळ ,आपत्कालीन सामाजिक संघटन कन्हान च्या सर्व पदाधिकार्यांनी सहकार्य केले .

*जिजाऊ ब्रिगेड शाखा कन्हान*

राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव जिजाऊ ब्रिगेड शाखा कन्हान च्या वतीने राजमाता जिजाऊ साहेब ,व क्रांतीज्योती सावित्रीबीई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार, मार्ल्यापन करून महिलाच्या विविध कार्यक्रमाने थटात साजरा करण्यात आला.
१२ जानेवारी २०२१ ला कोरोना च्या सावटात राजमाता जिजाऊ साहेब जयंती घरोघरी साजरी करुन जिजाऊ ब्रिगेड कन्हान च्या वतीने राजमाता जिजाऊ साहेब,व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला जिजाऊ ब्रिगेड अध्यक्षा मायाताई इंगोले यांच्या अध्यक्षते खाली नगराध्यक्षा करूणाताई आष्टणकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली असुन सर्व क्षेत्रात आज महिला अग्रेसर असल्या तरी सामाजिक व राजकीय क्षेत्रात महिलांनी जोमाने पुढाकार घेतल्यास देशाला प्रगती पथावर नेण्यास कोणीही अडवु शकत नाही. तसेच खरी लोकशाही देशात नादु शकेल असे मनोगत जिजाऊ ब्रिगेड च्या छायाकाई नाईक यांनी व्यकत केले. त्यानंतर महिलांनी विविध कार्यक्रम करून राजमाता जिजाऊ साहेब जयंती थटात साजरी करण्यात आली . कार्यक्रमाचे सुत्र संचालन सुषमा बांते यांनी केले तर आभार सुनिता ईखार यांनी व्यकत केले. स्नेह भोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रम यशस्विते करिता जिजाऊ ब्रिगेड कन्हान च्या मायाताई इंगोले, छाया ताई नाईक, सुनंदा दिवटे, कमलाताई गोतमारे, विद्या रहाटे, सिंधुताई खुरगे, सुषमा बांते, लताताई जळते, रंजना इंगोले, शितल बांते, मिनाक्षी भोयर, सुनिता ईखार, अनिता पाटील, पुनम राठी, खोब्रागडे ताई, किरण अनकर, अल्का कोल्हे, मनिषा धुडस, उज्वला लोखंडे, गि-हे ताई, पुष्पा चिखले, अनिता पांजुर्णे, उषाताई पोटभरे, पुष्पा बरलेवार, राजेश्वरी पिल्ले, नितु ओडियार, वाटकर ताई आदीने सहकार्य केले.

*सावित्रीबाई फुले महिला सामाजिक संस्था व्दारे राजमाता जिजाऊ जन्मोत्सव साजरा*

राजमाता जिजाऊ साहेब जयंती निमित्य सावित्रीबाई फुले महिला सामाजिक संस्था कन्हान च्या वतीने महामाया बुद्ध बिहार इंदिरा नगर कन्हान येथे राजमाता जिजाऊ साहेब व सावित्रीबाई फुले यांचा प्रतिमेला पुज्य माताजी महाथेरी रूपानंदा यांचा शुभ हस्ते माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. याप्रसंगी दुर्गाताई निकोसे यांनी मॉ साहेब जिजाऊ हयांनी शिवराय एक आदर्श राजा घडविला. त्यांच्या साहसी जीवना विषयी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. मायाताई चिमनकर यांनी राजमाता जिजाऊ यांच्या संघर्षमय जिवनावर प्रबोधनात्मक गीत प्रस्तुत केले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन प्रमिलाताई घोडेस्वार यांनी केले तर आभार आम्रपाली वानखेडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता सावित्री बाई फुले महिला सामाजिक संस्था कन्हान च्या मायाताई बेलेकर, शारदा वारके, रत्नमाला वराडे, उषा सांगोडे, दुर्गा गजभिये, संध्या साखरे, ज्योती मोटघरे, वत्सला कळमकर, मायाताई वाघमारे, विजया निकोसे , अनिताताई चाहांदे, गजभिये ताई, बागडे ताई, करूणाताई डोंगरे आदीने सहकार्य केले.

*मराठा सेवा संघ कन्हान*

राजमाता जिजाऊ साहेब जयंती निमित्य मराठा सेवा संघ कार्यालय तारसा रोड कन्हान येथे राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांच्या प्रतिमेस डॉ पं दे रा शि परिषद राज्य उपाध्यक्ष शांताराम जळते, ताराचंद निंबाळ कर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी कॉग्रेस किसान कमेटी नागपुर जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश काकडे, विरोधी पक्ष गट नेता राजेंद्र शेंदरे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्विते करिता ग्रामीण पत्रकार संघ जिल्हा उपाध्यक्ष मोतीराम रहाटे, वसंतराव इंगोले, राजुजी रेंघे पाटील, शिवशंकर वाकुडकर, योगराज अवसरे , दिपक तिवाडे, बाळासाहेब मेश्राम, सुरज करंडे, सुमित खैरकार, आयुष रेंघे आदीने सहकार्य केले.

*शिवशक्ती आखाडा येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी*

राजमाता जिजाऊ साहेब व स्वामी विवेकानंद यांचा संयुक्त जयंती निमित्य शिवशक्ती आखाडा बोरी (सिंगारदिप) व्दारे सर्व प्रथम राजमाता जिजाऊ साहेब, स्वामी विवेकांनद यांच्या प्रतिमेस गावातील वरिष्ठ नागरिक रामचंद्र राऊळ यांचा शुभ हस्ते माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. त्यानंतर मुलांनी शस्त्र प्रात्यक्षिक सादर करून मुलांनी आज च्या दिवसाचं महत्वावर मनोगत व्यकत केले. प्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्विते करिता शिवशक्ती आखाडा प्रमुख पायल येरणे, निकिता येरणे, सुहानी येरणे, हितेश डाफ, तृप्ती येवले, अंजली येवले, निकिता राठोड, निधी नागपुरे, निशा भोले, हर्षल येरणे, हर्षल राऊळ आदीने सहकार्य केले.

*श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान निलज , नेहरु युवा केंद्र , युवा चेतना मंच*

श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान निलज , नेहरु युवा केंद्र , युवा चेतना मंच यांचा संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊ साहेब ,व स्वामी विवेकानंद जयंती तसेच राष्ट्रीय युवा दिवस निमित्य निलज येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असुन छत्रपती शिवाजी महाराज , राजमाता जिजाऊ साहेब व स्वामी विवेकानंद यांचा प्रतिमेवर हार माल्यार्पण करुन व दीप प्रज्वलन करुन विविध कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता सामाजिक कार्यकर्ता रवींद्र चकोले , पुर्व राष्ट्रीय युवा कोर नेहरु युवा केंद्र , अध्यक्ष युवा चेतना मंच
यांनी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांचा विचारांवर व जीवनावर प्रकाश टाकला आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान निलज चा स्थापनेमागचा मुळ उद्देश गावकऱ्यांना सांगितला.
कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून लाभलेले जिल्हा परिषद सदस्य श्री व्यंकटेश कारेमोरे यांनी युवकांना स्वामी विवेकानंद यांचे विचार आत्मसात करुन आपले जीवन विवेकानंद यांचे सारखे ओजस्वी घडवावे असे आव्हान युवकांना करुन राष्ट्रीय युवा दिनाचा शुभेच्छा दिल्या .
राजमाता जिजाऊ साहेब व स्वामी विवेकानंद यांचा जयंती तसेच राष्ट्रीय युवा दिवस निमित्त चित्रकला स्पर्धा, कबड्डी स्पर्धा, निबंध स्पर्धा व स्वच्छ्ता अभियान राबवुन कार्यक्रम थटात संपन्न करण्यात आले . कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पंकज तोहने सरपंच ग्राम पंचायत निलज , ग्राम पंचायत सदस्य धनराज चकोले , कवडू खंडाते, नीला बाई पाहुणे , तंटा मुक्ती अध्यक्ष शेषराव चकोले पोलिस पाटील गुंडेराव चकोले , नरेश मडावी , भरत चकोले , देवमन तोहणे प्रामुख्याने उपस्थित होते . कार्यक्रमाचे सुत्र संचालन रोहित चकोले तर आभार कृणाल पाहुणे यांनी मानले . कार्यक्रम यशस्वीते करीता श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान निलज चे अध्यक्ष रणजित शिंदे मेश्राम , उपाध्यक्ष सुशील बावणे , सचिव श्रीकृष्ण पाहुणे , अक्षय चकोले , अनिकेत कारेमोरे राहुल पाहुणे , सूरज चकोले , पवण गभने, अंकुश चकोले निखिल कारेमोरे, प्रमोद भोयर , विकास उईके होम राज मेश्राम, आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान युवा चेतना मंच, नेहरु युवा केंद्र चे सर्व पदाधिकार्यांनी आणि ग्रामस्थांनी मोलाचे योगदान दिले .

*गहुहिवरा येथे राजमाता जिजा़ऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी*

गहुहिवरा युवक मित्र परिवार व्दारे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती कार्यक्रमासह साजरी करण्यात आली.
दि.१२ जानेवारी ला सायंकाळी गहुहिवरा येथे मॉ साहेब जिजाऊ, छत्रपती शिवराय, स्वामी विवेका नंद यांच्या प्रतिमेस जेष्ठ नागरिक शेषरावजी ठाकरे यांच्या अध्यक्षेत श्री जयकृष्ण (जयंत) निंबाळकर व निखिल पाटील यांच्या हसते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी पोलिस पाटील दुर्योधनजी ठाकरे, प्रदीप निंबाळकर, गजानन महल्ले, वसंतराव मसार, कृष्णा नाखले, महेंद्र श्यामराव शेंडे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन हर्षल निंबाळकर यांनी तर आभार स्वप्निल बोरकुटे यांनी मानले. यशस्वितेकरिता सुमित ठाक+रे, स्वप्नील बोरकुटे, हर्षल निंबाळकर, रोशन मसार, शेखर राऊत, प्रणव बोरकुटे, रोशन नाखले, राहुल लुहुरे, आकाश वैध, प्रमोद शेंडे, राहुल धांडे, निखिल धांडे, तुषार येरणे, निकील चव्हाण, मिलिंद चव्हाण आदीने सहकार्य केले.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …