*ग्रामपंचायत निवडणूक मतदान शांततेत*
*राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदारांनी पाटनसावंगी ग्रामपंचायत करिता मतदान करुन जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे अशी विनंती प्रसारमाध्यमांशी बोलताना केली*
सावनेर प्रतिनिधि – दिनेश चौरासिया सोबत सूरज सेलकर
सावनेरः नागपुर जिल्ह्यातील एकुण 130 ग्रामपंचायत निवडणूकीपैकी सावनेर तालुक्यातील 12 ग्रामपंचायती करीता मतदान शांतपणे पार पडले असुन सर्व उम्मेदवारांचे भवितव्य मतपेटीतून येणाऱ्या 18 जानेवारीला होणाऱ्या मतमोजणीतून स्पष्ट होणार.
ग्रामपंचायत निवडणुकीकरिता सर्वच पक्षासोबतच स्थानिक आघाड्यांनी आपआपले उम्मेदवार रिंगणात उतरवून भाग्य आजमावत आहेत.तसे बधितले तर तालुक्यातील होऊ घातलेल्या निवडणुकीत नांदोरी ग्रामपंचायत वगळता अधिकांश ग्रामपंचायतीवर राज्याचे पशुसंवर्धन दुग्धविकास, क्रीडा व युवा कल्याण मंत्री सुनील केदार गटाचा कब्जा असुन सोबतच मागील पंचायत समिती व जिल्हापरिषदेच्या निवडणुकीत विरोधकांना जोरका झटका देत जिल्ह्यातील जिल्हापरिषदेच्या सोबतच पंचायत समित्यांवर सत्ता काबीज करुण जिल्ह्यात भाजपसह इतर विरोधी पक्षांना जणुकाही भुईसपाट करत काँग्रेस पक्षाला सत्तेत ओढून आणत विरोधकांना बाहेचा रस्ता दाखवला होता हे विशेष
याचाच वाचपा काढण्याकरिता विरोधक एक होऊण काही ठिकाणी मंत्री सुनील केदार समर्थकांना आव्हान देण्याचा बेत आखुन मोर्चा बांधनी करत आहेत तर अनेक विरोधकांनी स्वतःला या निवडणुकीपासून दुर ठेवल्याचेही दिसुन येत आहे
जिल्ह्यातील 130 ग्रामपंचायत निवडणुकीत मतदात्यांचा काँग्रेस पक्षाकडे कौल –नागपुर जिल्हापरिषदेचे उपाध्यक्ष मनोहर कुंभारे
जिल्हापरिषदेचे उपाध्यक्ष यांनी आमच्या स्थानिक प्रतिनिधींशी बोलताना म्हटले की जिल्ह्यातील जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या मागील एक वर्षाचा कार्यकाळात काँग्रेसने केलेले लोकाभिमुख कार्य,कोरोना काळातील नियोजन तसेच प्रत्येक योजनांचा लाभ गरजूंना पोहचविण्याची तळमळ.
आ.सुनीलबाबू केदार यांच्या सक्षम नेतृत्वामुळे मतदात्यांचा मिळत असलेला कौल आम्हास आश्वासीत करत आहे की या निवडणुकीत आम्ही मोठी सरशी घेऊ असा विश्वास व्यक्त केला तर पंचायत समिती सावनेर चे उपसभापती प्रकाश पराते यांनी होऊ घातलेल्या 11 पैकी 11 ग्रामपंचायती जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला.
Maharashtra News Media सच की आवाज