*पाटणसावंगी ग्रामपंचायतवर केदार गटाचा दणदणीत विजय
पाटणसावंगी*
मुख्य संपादक – किशोर ढूंढेले
नागपुर- संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या पाटणसावंगी या पशुंसवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या गावी ग्रामपंचायत च्या निवडणुकीत केदार गटाला १७ पैकी १५ जागी विजय मिळाला तर भाजपला २ उमेदवारावर समाधान मानावे लागले.
येथे एकूण ६ वार्ड असून वार्ड क्र ६ मध्ये अविरोध निवडणुक होऊन केदार गटाचे राजश्री उमेश कश्यप व अनिता भाऊराव शिरसाट हे तर भाजपच्या इंदिरा विठोबा काळे अविरोध निवडून आल्या होत्या.
५ वार्ड साठी झालेल्या निवणुकीत १३ केदार गट तर १ भाजप असा एतीहासिक निकाल आज लागला.
विजयी झालेल्या उमेदवारांमध्ये वार्ड क्र. १ चे रामेश्वर क्षिरसागर, सीमा केदार, हारून शेख वार्ड क्र. २ मध्ये शिवशंकर चव्हाण, मनीषा पडोळे, रुपाली ठाकरे वार्ड क्र. ३ मध्ये राजेंद्र कडू, रोषनी ठाकरे, रुपाली कुमरे वार्ड क्रं ४ मध्ये प्रशांत बरडे, रोशन ढोक, सुनीता टेकाडे वार्ड क्रं ५ मध्ये दिपक दलाल, योगिता ठाकरे हे उमेदवार विजयी झाले आहे.
विजयी उमेदवारांनी मतदारांचे व कार्यकर्त्यांचे आभार मानले.
Maharashtra News Media सच की आवाज