Breaking News

*मोवाड ला निशुल्क रोग निदान व रक्तदान शिबिर*

*मोवाड ला निशुल्क रोग निदान व रक्तदान शिबिर*

 

नरखेड तालूका प्रतिनिधि- श्रीकांत मालधुरे

मोवाड – लता मंगेशकर हाँपीटल .नागपूर हिगाणा याच्या वैद्यकीय टिमच्या सहकार्यने दि.१८/१/२०२० रोज सोमवारला स्थळ नगरपरिषद उच्च माध्यमिक शाळेच्या मैदानात वर निशुल्क रोग निदान व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिराचे उद्घाटक माजी आमदार आशिष देशमुख यांच्या हस्ते करणेत आले.कार्यक्रमला उपस्थित म्हणून दिनकरराव राऊत, मोवाड मुख्यधिकारी पल्लवी राउत ,माजी न.प.अध्यक्ष सुरेश खसारे, रवींद्र वैघ,पुरुषोत्तम बागडे,दिपक बेले,फिरोज दिवाण,ईसमाईल शेख,नामदेव वाडबुद्धे, पुष्पाताई लुंगे, हिराचंद कडु,रवीं माळोदे,ज्ञानेश्वर दारोकर, या शिबिरात मोवाड मधील आरोग्य क्षेत्रात कार्य करणाऱ्या चा सत्कार करणेत आले ,तसेच या शिबिरात ४०० आरोग्य लाभार्थी व १५ रक्तदान दाते , तसेच नागपूर रेफर करीता ११० आजारी व्यकतीची नोद करण्यात आली.या शिबिरात दंत रोग सेवा,कान ,नाक, घसा,छातीरोग ,चर्म रोग या विभागाचे विशेषज्ञ डॉक्टर म्हणून उपस्थित सेवा देणारे डॉ.देवके,डॉ किशोर ढोबळे,डॉ केतन दागडीया,डॉ रामटेके,मिना पवार,शामल भेंडे,बि.डी.माढळे,व इतर आरोग्य सेवक व सेविका यांनी पण आपली सेवा दिलीत या मध्ये मोवाड मधील बाल,तरुण,वुद्धानी, महिलानी, षुरुषानी या शिबिरात मोठ्या संख्यात सहभाग नोदवीला शिबीर यशस्वी करतीता मोवाड मधील रवींद्र वैघ,श्रीकांत मालधुरे,ललित खंडेलवाल,सुनिल चुऱ्हे ,दिलीप बनाईत,रमेश जिचकार यांनी मोलाचे सहकार्य केले.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …