*परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ बोरडा यांच्याकडून हळदी कुंकुवाच कार्यक्रम संपन्न*

*अनेक महिला सेविकांनी घेतला सहभाग*
रामटेक प्रतिनिधी :- पंकज चौधरी
रामटेक – मकरसंक्रांत हा सण मराठी स्त्रियांचा अतिशय सुंदर सण म्हणून ओडखला जाणारा आहे.या दिवशी अनेक स्त्रिया एकत्रित येऊन हा सण अति उत्साहाने साजरा करतात.अशाच पद्धतीचा कार्यक्रम परमात्मा एक सेवक मंडळ बोरडा (गणेशी) येथे परमात्मा एक महिला मंडळ तर्फे मकरसंक्रांती निमित्त हळदी कुंकुवाचा कार्यक्रम संपन्न झाला.परमात्मा एक सेवक मंडळ बोरडा तर्फे दरवर्षी अशा प्रकारचा कार्यक्रम घेतल्या जाते.यात प्रामुख्याने महिला एकमेकांना वाण देऊन एकमेकांना गौरविण्यात येत असतात.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सौ.गीताबाई गजानन कडू हे होते.प्रमुख पाहुणे म्हणून सौ.प्रभाबाई बिसने उपस्थित होत्या.व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.स्वीटी मनोज नागपुरे यांनी केले.तसेच कार्यक्रमाचे सम्पूर्ण आयोजन सौ.जयश्री बंड, पूजा आजनकर,प्रिया बंड, पूजा गडे तसेच आदी सर्व परमात्मा एक सेवक मंडळ बोरडा चे सर्व कार्यकर्ते उपस्तीत होते.
Maharashtra News Media सच की आवाज