Breaking News

*दोन दिवसीय कार्यक्रमाने श्री दत्त जयंती थटात साजरी*

*दोन दिवसीय कार्यक्रमाने श्री दत्त जयंती थटात साजरी*

 

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – भाविक मंच दत्त नगर कांद्री व्दारे श्री दत्त मंदीरात पुजन, सुंदरकांड, भजन, वारकरी भजन, काकडा, दहीकाला या धार्मीक दोन दिवसीय कार्यक्रमाने श्री दत्त जयंती थटात साजरी करण्यात आली.


श्री दत्त मंदीर कांद्री येथे भाविक मंच श्री दत्त नगर कांद्री व्दारे कोव्हीड-१९ च्या नियमाचे पालन करित शोभाताई वझे, सुनिता हिवरकर, उषाताई वंजारी, कवडुजी आकरे, महेंद्र पलिये, नरेश पेटभरे, शरद किरपान यांचे हस्ते श्री चे पुजन, दिप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. दुपारी सस्वसती मानस मंडळाने सुंदरकांड चे गायन केले. सायंकाळी जयदुर्गा महिला भजन मंडळाचा व रात्री वारकरी भजन मंडळाचा कार्यक्रम करण्यात आला. दुस-या दिवसी सकाळी काकडा श्री गजानन भजन मंडळाने करून दुपारी २ वाजता श्री कवडुजी आकरे यांचे हस्ते दहीहंडी आणि आरती करून उपस्थित भाविक मंडळीना प्रसाद वितरण करून श्रीदत्त जयंती थटात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्विते करिता सस्वसती मानस मंडळाच्या लतादिदी सावनेरे, मालती वांढरे, किरण यादव, ज्योती हिवरकर, जय दुर्गा महिला भजन मंडळ कांद्रीच्या सुनिता हिवरकर, उषा वंजारी, अनुबाई वानखेडे, शोभा फुकटकर, मधुकर खडसे, वारकरी भजन मंडळाचे विक्रम वांढरे, केशव मस्के, मुरलीधर उमाळे, मधुकर कांबळे, जागेश्वर पाटी ल, गजानन भजन मंडळाचे फजित बावने, धनराज क्षिरसागर, शिवाजी चकोले, योगेंद्र आकरे, राजेश पोट भरे, रवि कामडे, अरूण पोटभरे , वामन देशमुख सह भाविक मंच दत्त नगर कांद्री व ग्रामस्थानी सहकार्य केले.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …