*निकृष्ट बंधारे ठरताहेत पांढरा हत्ती*

*शेतकऱ्यांची सिंचनाची समस्या जैसे थे*

*शासनाचे लाखो रुपये पाण्यात ; लोकप्रतिनीधींनी द्यावे लक्ष*
नरखेड तालुका प्रतिनिधी -श्रीकांत मालधुरे
मोवाड – सन १९९१ च्या महापूराआधी ३६५ दिवस वाहणारी वर्धा नदी गेल्या काही वर्षापासून डिसेंबर महीण्यात कोरड येते या वर्धा नदीवर मोवाड व खैरगाव येथे दोन कोल्हापूरी बंधारे आहे. पाठबंधारे व लघुसिंचन विभागाकडे याचे देखरेख आहे.
शहरातील सिंचनाची अपुरी व्यवस्था पुर्ण करून शेतपिकाचे उत्पन्न वाढीसाठी मागील ६ वर्षा अगोदर कोल्हापूरी बंधारा बांधण्यात आला. या बंधाऱ्यात दर वर्षी पाणी साठा करण्यात येतो. परंतु बंधारा कुचकामी झाल्याने विहरीची पाणी पातळी जैसे थे राहीली आहे. त्यामुळे सिंचनाची व्यवस्था जैसे थे असून बंधाऱ्यावार खर्च केलेले लाखो रुपयेही पाण्यात गेले आहे.
शहरातील वर्धानदीवर जलसंधारणाच्या नावावर कोल्हापूरी बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली. सन २०१३ मध्ये कौल्हापूरी बंधाऱ्याचे उद्याटन झाले. दर वर्षी पावसाळा संपता संपता शेवट या बंधाऱ्याचे गेट लावल्या जाते. जोपर्यंत वर्धानदी वाहती असते तो पर्यत कोल्हापुरी बंधारा भरला असतो . वर्धा नदी वाहण बंद झाली की या कोल्हापूरी बंधाऱ्यातील पाणी १ महीना सुध्दा रहत नाही. संपूर्ण लिकीज असलेल्या बंधाऱ्याचा फायदा शेतकऱ्यांना काहीही मिळत नाही.
वर्धा नदी वर हजारो हेक्टर मधील शेतकऱ्यांचे जिवन अवलंबून आहे. यावर्षी पावसाळा मोठ्या प्रमाणात झाला . शेतकऱ्यांच्या मनातील चिंता मिटली होती. पण मात्र जानेवारी महीना संपन्याच्या आधीच वर्धा नदीचे पाणी आटल्याने शेतकरी चिंतेत आला आहे.
कोल्हापूर बंधारेचे निकुष्टते मुळे मोवाडतील व आजुबाजुचे गावाची हजार संत्राची फळबाग पुर्णतः वाळून गेलेत जर बंधारेत पाणी राहले असते .तर ही वेळ आली नसती.कदाचित म्हणून शेतकऱ्यांनी यावर उपाय म्हणून सन २०१९ मध्ये मोवाड येथिल नागरिकांनी मोवाड फाऊंडेशन स्थापन स्वतः शेतकऱ्यांनी पैसे गोळ्या करून वर्धा नदीचे डोहाचे खोलीकरण व कोल्हार नदीवर रिवर्स ग्रेडींग केले होते. त्याचा फायदा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना मिळाला पूर्ण वर्धा नदीला कोरड आल्यानंतर फक्त नदीतील डोहातच पाणी शिल्लक आहे. अजून उन्हाळा लागायचा आहे. अश्यात उन्हाळ्यात पाणी टंचाई येतील का अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शेतकरी व मोवाड वासी जनता व आजुबाजुला गावातील लोक चिंते मध्ये आहेत.शासनाने मजबूत व काय स्वरूप योजना करने कीवा खोलीकरण केलेल्या सिमेंट ने बांधकाम करुन देणे .
Maharashtra News Media सच की आवाज