Breaking News

*युवा स्वाभिमान पार्टी आर्वी शहर शाखे ची मागणी* *घरकुल धारक, लाभार्थ्यांना तात्काळ उर्वरित टप्याचे -अनुदान द्या* *बांधकाम कामगारांचे रखडलेली नोंदणी प्रक्रिया व नूतनीकरण प्रक्रिया सुरु करा*

*युवा स्वाभिमान पार्टी आर्वी शहर शाखे ची मागणी*

*घरकुल धारक, लाभार्थ्यांना तात्काळ उर्वरित टप्याचे -अनुदान द्या*

*बांधकाम कामगारांचे रखडलेली नोंदणी प्रक्रिया व नूतनीकरण प्रक्रिया सुरु करा*

वर्धा प्रतिनिधि- पंकज रोकड़े

वर्धा- बांधकाम कामगारांन चे होत असलेले आर्थिक शोषण थांबवा शोषण करणाऱ्या दलालांची चौकशी करून दोषींन वर फौजदारी गुन्हे दखल करा*

*नूतनीकरणासाठी पोर्टल वर रजिस्ट्रेशन करण्याची किंवा शासकीय ठेकेदाराची सही शिक्याची जाचक अट रद्द करा*

कामगारांन कडून वीस हजार 20, 000 च्या अनुदान च्या ऐवजात घेतात दलाल 5000 हजार,
साठ हजार 60, 000च्या शिष्यवृत्ती वर घेतात दलाल
20, 000
शासनाद्वारा निर्देशित पोर्टल वर रजिस्ट्रेशन च होत नाही,तर शासकीय ठेकेदार सही शिक्का देत नाही
आर्वी :युवा स्वाभिमान पार्टी च्या महिला ता अध्यक्ष सौं रेखा वानखेडे, शहराध्यक्षा सौं प्रमिला हत्तीमारे, संघटिका सौं भारती पोटफोडे यांच्या नेतृत्वात विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे यांच्या मार्गदर्शनात आज दिनांक 20/01/2021रोज बुधवार ला
ना निवेदना द्वारा मागणी करण्यात आली या वेळी प्रामुख्याने आर्वी शहरात पंतप्रधान आवास योजनेतंर्गत घरकुल धारक लाभार्थ्यांना मागील मार्च -2020 पूर्वी पासून घरकुल योजनेचे अनुदान मिळालेले नाही आज गोर गरिबांची परिस्थिती फार नाजूक स्थितीत आहे कोरोना विषाणूचा कोप व्हायच्या अगोदर जेंव्हा गोर गरीब -जेमतेम परिस्थिती व सामान्यांना -पंतप्रधान आवास योजनेतर्गत घरकुल योजनेच्या लाभदायी योजनेतून जेंव्हा घरकुल मंजूर झाले सर्व कार्यालयीन प्रक्रिया झाली आणि त्याही पुढे जाऊन जेंव्हा अनुदानाचा पहिला टप्पा पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात आला तेंव्हा खऱ्या अर्थाने लाभार्थ्यांनी एक स्वप्न साकार होण्याची अनुभूती व आनंद व्यक्त केला परंतु अचानक कोरोना ने संपूर्ण देशभर कहर केला आणि जणू गोर -गरीब सामान्य, व मजूर वर्गावर एक मोठ संकट ओढवलं त्यात सर्वात संकटात आला तो घरकुल धारक पात्र लाभार्थी ज्याची परिस्थिती नाजूक -जेमतेम त्यात त्यांनी कोणाला पहिला टप्पा -तर कोणाला दुसरा टप्पा अनुदान मिळालं परंतु त्यांनी होत नव्हत जवडची पुंजी लावून घराचे बांधकाम सुरु केले, आणि पर्याय म्हणून भाड्याचे घर -रूम घेऊन स्वतः ही घर बांधकामात राबू लागले सर्वत्र रोजमजुरीची काम ही ठप्प त्यात मासिक घरभाडे कुठून भरायचे हा एक मोठा विचार घर अर्धवट न राहता येत न सोडता येत अशी बिकट अवस्था सध्या स्थितींत घरकुल धारक पात्र लाभार्थ्यांची झाली आहे, करिता आज युवा स्वाभिमान पार्टी महिला आघाडी च्या नेतृत्वात

विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे यांच्या मार्गदर्शनात मुख्याधिकारी…. यांना मागणी चे निवेदन सादर केले सोबतच सध्या स्थितीत मार्च पासून बांधकाम कामगारांचे नोंदणी व नूतनीकरण थांबलेले आहे ते तात्काळ सुरु करून कामगारांचे अधिकारी +कर्मचारी यांच्याशी दलालां मार्फत संगनमत करून केल्या जात असलेल शोषण थांबवून कामगारांची आर्थिक शोषण करणाऱ्या सर्व दोषींची चौकशी करून तात्काळ फौजदारी गुन्हे दखल करण्याची मागणी निवेदनात नमूद केली आहे शासनाद्वारे ज्या पोर्टलवर कामगारांच्या ठेकेदाराणा रजिस्ट्रेशन करण्याचे सुचवले आहे त्यां पोर्टल वर रजिस्ट्रेशन स्वीकारत नसल्याने व शासकीय ठेकेदार सही शिक्का देत नसल्याने कामगार हिताच्या योजनांना खीळ बसली आहे करिता निवेदनातून जाचक अट रद्द करून स्थानिक ठेकेदाराचं वेरिफिकेशन न. प द्वारा किंवा शासना द्वारा करून स्थानिक ठेकेदारांचे प्रमाणित सही शिक्के कामगार योजने साठी ग्राह्य धरण्याचे मागणी लावून धरली आहे तसेच युवा स्वाभिमान पार्टी च्या वतीने वरील मागण्याची पूर्तता न झाल्यास आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे स्वाभिमानी सैनिक व महिला आघाडीच्या ता अध्यक्षा रेखा वानखेडे, शहराध्यक्षा प्रमिला हत्तीमारे, भारती पोटफोडे, सौं इरपाचे, सौं भगोले, सौं मल्लेवार, बादल काळे कमलेश चिंधेकर, सिद्धांत कळंबे, अमोल बेलेकर, यानी दिलीप पोटफोडे यांच्या मार्गदर्शनात दिला आहे केली आहे, निवेदन देतानानिवेदनावर शंभर च्या वर स्वाक्षरी बांधकाम कामगार व घरकुल धारक उर्वरित अनुदाना च्या प्रतीक्षेत असलेले भारत कंगाले, शंकर हत्तीमारे, सुरेंद्र वाटकर, वसंता कोहाड, शरद धनाडे, होमराज बारापात्रे, संतोष टिपले, बाजीराव ढोबळे, विठ्ठलराव गोवर, सुनीता वानखेडे, राजु बन्सोड, मंगेश लांजेवार, रामेश्वर वाघमारे, राजु नारनवरे, रमेश भोयर,, भक्तराज बारबैले, रघुनाथ चोपकर, नूर जा बी, शेख जिब्राइल, चंद्रकला बनकर, तमीजा बी अब्दुल सलाम, अब्दुल हसन, अब्दुल सलाम, शिवाजी वानखेडे, विद्या बनकर, शिला भुसारी, नरेंद्र पेठकर, शँकर ठाकरे, राजु पवनकर, सदाशिव इरपाचे, सुखदेव मरस्कोल्हे, सुनीता आरे, अशोकराव पारधी, देविदास तरोणे, पार्वताबाई मल्लेवार, सुभाष भगोले, बेबीबाई गावंडे, राजु येडने, तुळशीराम मेश्राम, शिला कंगाले, कौसल्याबाई नागोसे, सुनीता बेलेकर, किरण झटाले, यशवन्त डोळस, पद्मा काळे, बंडू काळे, धन्यानेश्ववर भोयर, रेखा कालोकार, रीना चोरपागार, मंदाबाई मोटघरे, नंदकिशोर सातपुते, यादवराव डोंगरे आदि.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …