Breaking News

*रामटेक येथील किसान सभेचे व जनवादी महिला संघटनेचे 15 कार्यकर्ते मुबंई येथील शेतकरी आंदोलनाचा समर्थनात*

*रामटेक येथील किसान सभेचे व जनवादी महिला संघटनेचे 15 कार्यकर्ते मुबंई येथील शेतकरी आंदोलनाचा समर्थनात*

 

विशेष प्रतिनिधि

रामटेक –  येथील किसान सभेचे व जनवादी महिला संघटनेचे 15 कार्यकर्ते मुबंई येथील शेतकरी आंदोलनाचा समर्थनात होणाऱ्या तीन दिवसीय महापाडावात सामील होण्यासाठी आज 23 जानेवारी रोजी सकाळी 12 वाजता अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हा उपाध्यक्ष, कॉ. राजू हटवार यांचा नेतृत्वाखाली रवाना झालेत. 23 ते 26 जानेवारी दरम्यान हा महापाडाव होणार असून यात हजारो शेतकऱ्यांन सोबत कामगार , युवा , विद्यार्थी व महिला ही सामील होणार आहेत. दिल्लीतील संयुक्त किसान मोर्चा ने 23 ते 26 जानेवारी दरम्यान प्रत्येक राज्याचा राजधानीत शेतकऱ्यांचा समर्थनात आंदोलन करावीत हा कॉल दिला गेला होता. शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा, शेतीमालाला आधार भावाचे सरंक्षण देणारे कायदे करा, वीज विधेयक मागे घ्या, कामगार कायद्यातील बदल रद्द करा इत्यादी प्रमुख मागण्या आहेत.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …