Breaking News

*उमंग गीताई कॉलेज ऑफ वुमन एज्युकेशन येथे 125 वी सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली*

*उमंग गीताई कॉलेज ऑफ वुमन एज्युकेशन येथे 125 वी सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली*

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले
कोराडी:- उमंग गीताई कॉलेज ऑफ एज्युकेशन कोराडी रोड, पांजरा येथे दिनांक 23 जानेवारी 2021 रोजी सुभाष चंद्र बोस यांची 125 वी जयंती “पराक्रम दिवस” म्हणून उत्साहाने सोशल डिस्टेसिंगचे पालन करून साजरी करण्यात आली. याप्रसंगी वेबिनार चे आयोजन करण्यात आले फॅमिली कोर्ट यवतमाळ धनंजय मानकर यांनी सुभाष चंद्र बोस यांच्या जीवनाबद्दल माहिती देऊन त्यांचे विचाराचे महत्त्व पटवून दिले. तसेच वेबिनार मध्ये सुभाष चंद्र बोस यांची डॉक्युमेंटरी फिल्म दाखवून त्यांनी केलेल्या विविध कार्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित कॉलेजच्या संचालिका वैशाली फुले व प्राचार्य डॉक्टर अतुल टेकाडे यांनी दीप प्रज्वलन करून सुभाष चंद्र बोस यांच्या फोटोला माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमाला कॉलेजची सहकर्मचारी निलेश मेश्राम, पवन करमेले, मनीषा लोहांडे, दर्शना, वंदना उपस्थित होत्या

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …