Breaking News

*मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यास ग्रामपंचायतीची टोलवाटोलवी* *नांदा येथील व्यापारी व नागरिक त्रस्त* *अनेकांचा अपघात*

*मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यास ग्रामपंचायतीची टोलवाटोलवी*

*नांदा येथील व्यापारी व नागरिक त्रस्त*

*अनेकांचा अपघात*

 

कोरपना प्रतिनिधि -गौतम धोटे

कोरपना :- गडचांदूर – आवारपूर – वणी राज्यमार्गावर मोकाट जनावरांचा हैदोस वाढल्याने अनेकांचे अपघात झाले असून नागरीक व व्यापारी कमालीचे त्रस्त झाले आहे मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली असता येथील ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व प्रशासनिक अधिकारी टोलवाटोलवीचे उत्तर देत असल्याने मोकाट जनावरांचा बंदोबस्त स्वत: नागरिकांनी करावा का असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

कोरपना तालुक्यातील नांदा ग्रामपंचायत जिल्ह्यात नावाजलेली आहे मागील तीन वर्षांपासून नांदाफाटा बाजारपेठ परिसरात मोकाट जनावरांचे प्रमाण वाढले आहे मोकाट जनावरांचे जत्थेच्या जत्थे गडचांदूर – आवारपूर – वणी या राज्यमार्गावर बसलेले व फिरतांना दिसतात यामुळे अनेक मोटारसायकलस्वारांचा अपघात होऊन दुखापत झालेली आहे मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे असल्याने नागरिकांना व व्यापारीवर्गाला कमालीचा त्रास होत आहे मोकाट जनावरे मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत घाण करून ठेवतात मोकाट जनावरे आपल्या दुकानासमोर घाण करु नये याकरिता दररोज रात्री व्यापारीवर्गाला बॅरिकेटिंग करून ठेवावी लागते मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी अनेकदा नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे केली असता ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आमच्याकडे कोंडवाडाच नसल्याने आम्ही काही करू शकत नसल्याचे सांगत होते वर्षभरापूर्वी ग्रामपंचायतीद्वारे कोंडवाडा बनविला कोंडवाडा तयार झाला असतांनाही मोकाट जनावरांचा बंदोबस्त ग्रामपंचायत करण्यास तयार नाही याबाबत ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना व अधिकार्‍यांना जाब विचारला असता टोलवाटोलवीचे उत्तरे दिली जातात गावातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कर वसुली केली जाते नागरिकांकडून मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली असता ग्रामपंचायतीचे पदाधिकारी तक्रार कर्त्यालाच उलटे उत्तर देतात की तुम्हाला जनावरांचा त्रास आहे तर तुम्ही जनावरे कोंडवाड्यात भरती करा ग्रामपंचायत कशाला भरती करतील मोकाट जनावरांमुळे येथील व्यापारी वर्गाला व नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे राज्य मार्गावर मोकाट जनावरे फिरत असल्याने अपघात होऊन जीवितहानी होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यास ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व अधिकारी टोलवाटोलवी करीत असल्याने कोरपना पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी याकडे लक्ष देऊन ग्रामपंचायतीला मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याचा आदेश देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …