Breaking News

*वरोरा येथील शिवसैनिका कडून श्री बाळासाहेब ठाकरे यांची ९५ जयंती साजरी*

*वरोरा येथील शिवसैनिका कडून श्री बाळासाहेब ठाकरे यांची ९५ जयंती साजरी*

वरोरा प्रतिनिधि – जुबेर शेख

वरोरा – हिंदू हृदय सम्राट शिव सेना पक्ष प्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्य ज्येष्ठ शिव सैनिकाच्या हस्ते माल्यार्पण करून वरोरा येथे शिव सेना तालुका कार्यालयात बाळासाहेबांना आदरांजली देण्यात आली.
शिव सेना संपर्क प्रमुख मा. प्रशांतदादा कदम,वरोरा विधानसभा संपर्क प्रमुख संजयजी काळे यांच्या सुचने नुसार शिव सेना जिल्हा प्रमुख नितीनभाऊ मत्ते यांच्या आदेशानुसार प्रत्येक शासकीय कार्यालयात बाळासाहेबांची प्रतिमा असावी मनहून तहसील कार्यालय,पोलीस स्टेशन आणि उपजिल्हा रुग्णालयात बाळासाहेबांची प्रतिमा देऊन जयंती उत्सव साजरी करण्यात आली.
यावेळी शिव सेना उपजिल्हा प्रमुख रमेशभाऊ मेश्राम,युवा सेना जिल्हा चिटणीस मनीष जेठाणी,शिव सेना वरोरा शहर प्रमुख संदीप मेश्राम,नगर सेवक दिनेश यादव,शिव सेना उपतालुका प्रमुख लक्ष्मनराव ठेंगने,उपतालुका प्रमुख सागर पिपलशेंडे,कंत्राटी कामगार सेना शहर प्रमुख बाळू रुयारकर,युवा सेना शहर प्रमुख गणेश जानवे,अक्षय ताजने,अतुल नांदे,आशिष बोकडे आणि असंख्य शिव सेना युवा सेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहली

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …