*शिवराय क्रिकेट क्लब जामगाव(बु) यांच्या तर्फे आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट सर्कल मॅचचे शिव सेना पदाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन सम्पन्न*
वरोरा प्रतिनिधि – जुबेर शेख
वरोरा –शिवराय क्रिकेट क्लब जामगाव(बु) यांच्या तर्फे आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट सर्कल मॅचचे सामन्याचे उद्घाटन करिता युवा सेना जिल्हा चिटणीस मनीष जेठाणी,शिव सेना वरोरा शहर प्रमुख संदीप मेश्राम,माजी सरपंच, उपतालुका प्रमुख वरोरा शिवसेना तथा निराधार तहसील कमिटी सदस्य लक्ष्मणरावजी ठेंगणे,नगरसेवक दिनेश यादव,युवा सेना तालुका प्रमुख तथा बोर्डा ग्रामपंचायत सदस्य भूषण बुरीले शंकरभाऊ धानकी शाखा प्रमुख जामगांव, अक्षय ताजने उपतालुका प्रमुख युवा सेना वरोरा उपस्थित होते.
यावेडेस युवा सेना जिल्हा चिटणीस मनीष जेठाणी यांनी मनोगत व्यक्त करतांना आपले शिव सेनेचे जिल्हा प्रमुख नितीनभाऊ मत्ते हे सुद्दा एक खेळाडू आहेत नितीनभाऊ मत्ते आणि शिव सेना पक्ष आपल्या जिल्ह्याचा नावलौकिक करणाऱ्या सर्व खेळाडूच्या पाठीशी आहे जी काही मदत लागेल ती आम्ही करायला तयार आहो अशे आश्वासन दिले आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या.तसेच तालुका प्रमुख शिवसेना वरोरा मुकेशभाऊ जिवतोडे यांनी सुद्धा खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. तसेच युवा सेना तालुका प्रमुख भूषण बुरेले यांनी स्वतः बॅट घेऊन खेळांचा आनंद घेतला .
सामन्याचे आयोजन शिवराय क्रिकेट कमिटीचे गणेश कुरेकार,गजानन पाऊनकर,पवन शेंडे,सुरज चिडे, वैभव राजूरकर, बालाजी पिंपळकर यांनी उदघाटन करीता आलेल्या पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
सामना व उद्घाटन सोहळा करिता गावकरी,खेळाडू तसेच क्रिकेट प्रेमी उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज