*सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी अल्फिया पठाण हीची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड*
नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले
कोराडी:- सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयाची अकरावी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी अल्फिया पठाण ने आंतरराष्ट्रीय महिला मुष्टियुद्धेत राष्ट्रीय स्तरावर अव्वल स्थान प्राप्त करण्याचा युवा गटात तिसऱ्यांदा मान पटकाविला आहे. मुला-मुलींकरीता आयोजित ही स्पर्धा भारतीय मुष्टियुद्ध महासंघ व भारतीय क्रीडा प्राधिकरण तर्फे रोहतक येथे आयोजित राष्ट्रीय मानांकन मुष्टियुद्ध स्पर्धेत 81 किलो वरील गटात प्रतिस्पर्ध्यांना मात देत अल्फिया ने प्रथम स्थान पटकाविले. या वयोगटात भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या विविध केंद्रातील एकूण सहा खेळाडू सहभागी झाल्या होत्या . अल्फिया ने उपांत्य फेरीत आसामच्या खेळाडुला 40 सेकंदात बाद करीत अंतिम फेरी गाठली. त्यानंतर निर्णायक लढतीत पंजाबच्या मुष्टियोद्धाला मात दिली व आपले स्थान निश्चित केले. यापूर्वी 2019 मध्ये आयोजित जूनियर चॅम्पियनशिपमध्ये 80 किलो पेक्षा वरील गटात सुवर्णपदक जिंकून तिने आपले स्थान कायम ठेवले होते . अल्फिया ला मुष्टियुद्धात तिचे कोच गणेश पुरोहित यांचे सतत मार्गदर्शन लाभत राहिलेले आहे त्याचबरोबर मार्च महिन्यात होऊ घातलेली युवा वर्ल्ड चंपियनशिप व त्यानंतर होणाऱ्या दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी खेळाडूंची निवड करण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. पुढील स्पर्धेकरता तिला नेशनल मुष्टियोद्धा चे कोच भास्कर भट यांचे मार्गदर्शन लाभणार आहे . तिच्या या यशाकरिता सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या संस्थेच्या संचालिका सौ लता वाघ मॅडम यांनी तिचे अभिनंदन करीत पुढील खेळाकरिता शुभेच्छा दिल्या आहे. त्याचबरोबर संस्थेचे सचिव संस्थापक डॉ. मारोती वाघ ,संस्थेचे स्थायी सदस्य प्राध्यापक वसंत हिवरकर यांनी देखील अभिनंदन केले आहे. प्राध्यापक वर्गाने सुद्धा तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करीत पुढील खेळाकरिता शुभेच्छा दिल्या आहे.
Maharashtra News Media सच की आवाज