*तायवाडे महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा*
नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले
कोराडी:- स्थानिय तायवाडे ग्रुपस् ऑफ इस्टीट्यूशन महादूला-कोराडीच्या प्रागंणात प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.शरयू तायवाडे होत्या. सच्चिदांनद शिक्षण संस्थेच्या प्रागंणात डॉ.शरयु तायवाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ.चंद्रशेखर डोईफोडे ( प्राचार्य, तायवाडे कॉलेज अॉफ फार्मसी),प्रा.विक्रांत चिलाटे (तायवाडे
कॉलेज अॉफ डीप्लोमा ईन फार्मसी)
सौ.प्रेरणा झा ( प्राचार्य तायवाडे पब्लिक स्कूल ) या होत्या.कार्यक्रमाची सुरवात झेंडा वदंन करून राष्ट्रगीताने झाली.या कार्यक्रमाचे संचालन महाविद्यालयातील शारीरिक शिक्षक डॉ.सुनील भोतमांगे यांनी केले. याकार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थी, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज