*नांदागोमुख सरपंच जगदीश जिवतोडे यांचे अभिनव प्रेरणादायी ध्वजारोहण*
मुख्य संपादक किशोर ढूंढेले
नांदागोमुख-सावनेर येथे ७२वा गणराज्यदिन एका आगळ्या वेगळ्या घटनेने पुन्हा एकदा संस्मरणीय ठरला. येथील सरपंच श्री विवेक उर्फ जगदीश जिवतोडे यांनी नांदागोमुख येथील स्थानिक विद्यालय मधून इयत्ता १० मध्ये जो विद्यार्थी/ विद्यार्थिनी प्रथम येईल तो १५ ऑगस्ट व इयत्ता १२ वी मध्ये जो विद्यार्थी प्रथम येईल तो २६ जानेवारी रोजी ध्वजारोहण करेल असे जाहीर केले होते. दिलेल्या वचनाप्रमाणे सर्व ग्रामस्थांच्या साक्षीने ग्रामपंचायत प्रांगणात इयत्ता १० वी ला प्रथम आलेली विद्यार्थ्यांनी कु नंदिनी विश्वंभर धांडे या मुलीने स्वातंत्र्यदिन व आता १२ वी ला प्रथम आलेल्या कु.नेहा वसंतराव दोरखंडे हीने गणराज्यादिनाचे ध्वजारोहण शासनाद्वारे निर्गमित सर्व आदेश पाळून तसेच सुरक्षित अंतर ठेवून केले. सरपंचांच्या या कौतुकास्पद निर्णयाने देशातील इतर गावांना सुद्धा नवा आदर्श घालून दिलेला आहे.
कुठल्याही राजकीय व्यक्ती च्या हस्ते झेंडा वंदन करणे ऐवजी विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वज फडकवविण्याचा मान दिल्यास तो गौरव मिळविण्यासाठी मुले अभ्यास करायला लागतील. प्रत्येक गावाने हे केलं तर गावातील राजकारण बंद होवून खरे समाजकारण होईल व अभ्यासू पिढी निर्माण होईल. तसेच गावातील प्रत्येकाने गाव आदर्श करण्यासाठी सर्वप्रथम स्वतःमध्ये आदर्श विचारांची पेरणी करावी असे प्रतिपादन सरपंच विवेक उर्फ जगदीश जिवतोडे आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी याप्रसंगी केले.
Maharashtra News Media सच की आवाज