Breaking News

*सरस्वती इन्स्टिट्यूटमध्ये 72वा गणराज्य दिन साजरा*

*सरस्वती इन्स्टिट्यूटमध्ये 72वा गणराज्य दिन साजरा*

 

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले

कोराडी:- छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेद्वारा संचालित रामकृष्ण वाघ कला व वाणिज्य महाविद्यालय, सरस्वती माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय, सरस्वती भवन कॉन्व्हेंट अंड हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने गणराज्य दिन साजरा करण्यात आला. संस्थेचे सचिव डॉ.मारुती वाघ यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले .कार्यक्रमाला संस्थेच्या संचालिका प्राचार्या सौ लता वाघ, सरस्वती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शोभणे ,रामकृष्ण वाघ कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य पंकज झगडे ,सरस्वती भवन कॉन्व्हेंटच्या मुख्याध्यापिका केरेन यंगड जोसेफ, सरस्वती भवन हायस्कूलच्या मुख्याध्यापिका निशा फिलिप्स उपस्थित होत्या. कार्यक्रमाला उपस्थित संस्थेच्या संचालिका प्राचार्य सौ लता वाघ यांनी शिक्षकांना उद्बोधन करीत असताना गणराज्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या व देशाला एक सम्यक संविधान देणाऱ्याना त्यांच्या या कार्याला प्रत्येकाने सलाम करीत आपणही प्रजासत्ताक भारताच्या लोकशाहीचा पाया कसा मजबूत करू शकू याचा प्रत्येकाने विचार करावा असे सांगितले तसेच शिक्षकांना मार्गदर्शन करीतआपल्याला विद्यार्थ्यांच्या आरोग्याला जपत शाळेला प्राधान्य देत सुव्यवस्थित नियोजनानुसार आपापली जबाबदारी पार पाडावी असे सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना संस्थेचे सचिव डॉक्टर मारोती वाघ यांनी गणराज्य दिनानिमित्त महान नेत्यांनी जी काही लोकशाहीचे तत्व आपल्या समोर ठेवलेली आहे त्याचा प्रत्येकाने आपल्या जीवनात उपयोग करून विद्यार्थ्यांच्या भविष्याची निव याच पद्धतीने प्रत्येक शिक्षकाने राखावी असे आव्हान केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक माधुरी आचार्य तर आभार प्राध्यापक रश्मी जवंजाळ यांनी केले.कार्यक्रम covid-19 च्या नियमानुसार पार पडला.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …