Breaking News

*धानाच्या गंजीला आग लागुन शेतक-यांचे दिड लाखाचे नुकसान*

*धानाच्या गंजीला आग लागुन शेतक-यांचे दिड लाखाचे नुकसान*

कन्हान प्रतिनिधि – ॠफभ बावनकर

कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत वाघोली येथील शेतकरी शालीकजी काकडे यांनी धानपिकाची कापणी करून शेतात ठेवलेल्या चार एकर मधिल धानाच्या गंजीला सकाळी आग लागुन राख झाली. तर लागुनच असलेली पाच एकरांच्या धानाच्या गंजीला गावक-यांच्या मदतीने वाचविण्यात आले. ८० ते ८५ धान बोर्यांची गंजी जळुन शेतकर्यांचे जवळपास दिड लाखाचे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे.


सोमवार (दि.२५) ला सकाळी ८ वाजता दरम्यान नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गा लगत वाघोली येथे शेतकरी शालीकजी सदाशिव काकडे राहणार वाघोली यांचे शेत स न ९८/४ आराजी १. ०९ ( अडीच एकरा +) असुन धान पिकाची कापणी करून ठेवलेल्या धानाच्या गंजी ला आग लागली. गावकर्यांना दिसले असता शालीकजी काकडे यांना बोलावुन गावकर्यांनी ट्रक्टर मध्ये पाणी आणुन मदत कार्य करित पर्यंत ही एक गंजी जळुन राख झाली . तर लागुनच असलेली धानाची गंजी आगी पासुन वाचविण्यास गावकर्यांना यश आले. कोरोना महामारी मुळे बाहेरील मजदुर वर्ग पाहीजे त्या प्रमाणात येत नसल्याने या वर्षी मजुरांच्या कमतरतेने मजुरांची रोजी जास्त देऊन मजुर मिळत नसल्याने धानाची लावण, कापणी व मळणी ला उशीर होत असुन
शेता मध्ये धानाच्या गंज्या लावुन ठेवलेल्या आहे. अश्याच वाघोली येथील शेतकरी शालीकजी काकडे यांच्या शेतातील अडीच एकराच्या धानाची गंजी जळुन राख होऊन जवळपास दिड लाखाचे नुकसान झाले तर लागुनच असलेल्या गंजी आगीपासुन वाचविण्यास गावकर्यांच्या मदत कार्यास यश आले. या कठीण वेळेत शेतकर्यांच्या धानाच्या गंजी आगीत राख होऊन नुकसान झाल्याने शासनाने शेतकर्यास आर्थिक मदत देण्याची मागणी किसान कॉंग्रेस कमेटी नागपुर ग्रामिण जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश काकडे, ग्रामपंचायत सदस्य राकेश काकडे, मोरेश्वर काकडे, नारायण जुनघरे, लक्ष्मीकांत काकडे, सुरेश काकडे, जगदीश काकडे, विशाधर गेडाम, रंगराव काकडे सह आदि गावकर्यांनी केली आहे .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …