*स्वामी विवेकानंद युथ फाऊंडेशन वरोरा तर्फे ७२ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कोरोना योद्धांचा सन्मान*

वरोरा प्रतिनिधि -जुबेर शेख
वरोरा :- २६ जानेवारी २०२१ ला ७२ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त स्वामी विवेकानंद युथ फाऊंडेशन वरोरा तर्फे कोरोना महामारीच्या संकटात आपल्या प्राणाची आणी कुटुंबाची पर्वा न करता दिवसरात्र देश सेवा करणाऱ्या पोलीस, डाँक्टर, नर्स, साफसफाई कर्मचारी म्हणजे उपजिल्हा रूग्णालय वरोरा , नगरपरिषद वरोरा, पोलीस वरोरा व डॉक्टर असोसिएशन ,तसेच माजी सैनिक यांचा आज सन्मान करण्यात आला. उपजिल्हा रुग्णालय येथे ध्वजवंदन झाल्यावर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली उपजिल्हा रुग्णालय येथे समस्त रुग्णसेवकांच्या साठी प्रातिनिधिक स्वरूपाचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. पोलीस स्टेशन वरोरा येथे समस्त पोलीस कर्मचाऱ्यांसाठी ठाणेदार श्री खोब्रागडे साहेब यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला.
समस्त नगर परिषद कर्मचारी यांना नगराध्यक्ष श्री अहेतेश्याम अली यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला तसेच वरोरा शहरातील डॉक्टर असोसिएशन चे डॉ.ढवस तसेच डॉ.तेला यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला,तसेच वरोरा शहरातील भर्तीपूर्ण प्रशिक्षण मोफत सुरुवात करून आदर्श ठेवणारे माजी सैनिक रिटा.मेजर श्री सागरजी कोहळे यांचाही सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या तथा सहकार्य केले. कार्यक्रमाला अध्यक्ष श्री जितेश कायरकर,उपाध्यक्ष श्री शुभम दौलतकर,सचिव श्री विद्याधर डोंगरे,सहसचिव श्री प्रफुल ठेंगणे,वैभव डोंगरावर,रुपेश ठेंगणे, अंकुश रट्टे , महेश दर्वे , दिनेश जरीले व इतर सर्व सदस्य उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज