*बीना संगमावर उसळली एकच गर्दी*

*प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने कोरोनावर विजय मिळवील्याचा आनंदोत्सव*
सावनेर प्रतिनिधी – शुभम ढवळे
सावनेर ः तालुक्यातील खापरखेडा पोलीस स्टेशन हद्दीतील बीना संगमावर प्रजासत्ताक दिनी एकच गर्दी उसळून आल्याने कन्हान व पेच नदीच्या या संगमाला चौपाटीचे स्वरूप प्राप्त झाल्याचे दिसून आले.
*मागील एक वर्षापासून कोरोना विषाणूचा वाढत्या प्रभावावर आळा घालण्यासाठी केन्द्र व राज्य शासनाने वेळोवेळी जाहीर केलेल्या दिशानिर्देशाचे पालन प्रत्येक नागरिकांनी केले मात्र जसजसा वेळ निघत गेला नागरिक स्वतःला बंदिस्त जाणून घेत होत.हळूहळू या कठोर दिशानिर्देशाचे रुपांतर होऊ लागले व लोकांनी स्वतःला याबंधिस्त जिवनातून स्वतंत्र समझत परिवारा सोबत प्रेक्षणीय स्थळे व इतर ठिकाणी मौज मस्तीचा बेत आखत आहेत*
*याचे प्रत्यक्ष उदाहरण प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी तालुक्यातील बीना संगमावर बघावयास मीळाले निसर्गरम्य वातावरणात असलेले हे ठिकाणी विशेषतः अस्थी विसर्जन व ऋषीस्नानासाठी प्रसिद्ध असुन संगमरवर असलेले कन्हान नदिचे मोठे पात्र व पांढरीशुभ्र रेती पर्याटकांना आपल्याकडे आकर्षित करते तर नदीच्या पात्रात व काठावर अल्प दरात मीळणार्या गावरान ज्वारीच्या भाकरी,मीरचीचा ठेचा,वांगेचे भरीत व झुनका तसेच कच्चा चिवडा येथील वैशिष्ट्य आहे.त्यामुळे शहरी नागरिकांसोबतच ग्रामीण भागातील पर्याटकांना कमी खर्चात आपल्या परिवारासोबत याठिकाणी विशेष पर्व अथवा रविवारला आवार्जुन हजरी लाववतात*

Maharashtra News Media सच की आवाज