Breaking News

*मौजा घोघरा महादेव मंदिर पेच नदी पात्रात डुबुन गेला पुन्हा एका मुलाचा जीव* *तिन दिवसात दोन लोंकाचा पेच नदीत बुडुन मृत्यु*

*मौजा घोघरा महादेव मंदिर पेच नदी पात्रात डुबुन गेला पुन्हा एका मुलाचा जीव*

*तिन दिवसात दोन लोंकाचा पेच नदीत बुडुन मृत्यु*

पारशिवनी तालुका प्रतिनिधी-कमलसिंह यादव

पारशिवनी – पारशिवनी पोलीस स्टेशन च्या हदीत येणार्या मौजा घोघरा महादेव मंदिर पेच नदी च्या पात्रता मंगलवारी २६ जनवरी ला फिरायला व दर्शना करिता आले एका २३ वर्षीय मुलाचा जीव गेल्याची घटना समोर आल्याने पारशिवनी पोलीसांनी घटनास्थळी पोहचुन त्याला ग्रामीण रुग्णालयात पारशिवनी ला नेले असता डॉक्टरांनी मृतक घोषित केले असता पारशिवनी पोलीसांनी फिर्यादी विकास उर्फ कैलाश रत्नाकर गिरी राहणार बैलवाङा पोस्ट गुमथी ताः जि नागपुर नागपुर यांचा तक्रारी वरुन आकस्मिक मृत्यु च्या गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरू केला आहे .
मिळालेल्या माहिती नुसार मंगलवारी दिनांक २६ जानेवारी (प्रजासताका दिन) ला सकाळी 11: 00 वाजता च्या सुमारास मृतक सागर हरिकिसन गिरी राहणार बैलवाङा आपले ५ मित्रा सह पारशिवनी घोगरा महादेव मंदिर येथे दर्शन करायला व फिरायला आले असता मित्रा सोबत दुपारी १,०० वाजता च्या सुमारास मित्रा सह आघोळी ला पेच नदी च्या पात्रता आंघोळ करत असतांनी कुणी तरी पाण्यात डुबत आहे असे आवाज आले असता सर्व लोक नदी कडे धावले असता त्याच वेळी यांचे मित्र पा०यात बुडाळा,असता , लोकानी कर्तव्यावर असलेला पोलिसाना दिली त्वरित घटना स्थळी पाराशिवनी पोलिस स्टेशन चे पोलिस उपानिरिक्षक ज्ञानबा पळनाते ,मेजर प्रभाकर झोड़,पोलिस नायक हरिष सोनभद्ररे, हेमंत रंगारी,विजय काकडे,गोपाल डोकरमारे ,पंकज वासाडे,होमगार्ड राजेश लोखंडे यानी घटना स्थळी पोहचुन मृतक चा मित्राचे सहकार्यने नदी मधुन यांना नदीच्या बाहेर काढुन ठेवले असता सागर हरीकिसन गिरी रा बैलवडा,वय २३वर्ष हा मुलगा पा०यात बुडुन मृत्यु झाला होता यावेळी यांचा मित्रांनी या मृतक सागर या मुलाला पारशिवनी ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तापास करुन त्याला मृत्यु घोषित केले . घोघरा पेच नदीत पाण्यात बुडुन मख्याची तिन दिवसात दसरी घटना आहें या पुर्वी २४जनवरी ला १३ वर्षचे मुलाचा पा०यात बुडुन मृत्यु झाली होती,
पारशिवनी पोलीसांनी फिर्यादी विकास उर्फ कैलाश २त्नाकर गिरी यांचा तक्रारी वरुन मर्ग क्रमांक ०६/२०२१ कलम १७४ चा गुन्हा दाखल करुन पुढील तपास पुलिस निरिक्षक संतोष वैरागडे यांचे मार्गदर्शनात पुलिस उप निरीक्षक सह पुलिसानी तपास सुरू केला आहे .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …