Breaking News

*”ओल्या सांजवेळी”कादंबरीचे विमोचम*

*”ओल्या सांजवेळी”कादंबरीचे विमोचम*

मुख्य संपादक-किशोर ढूंढेले
नागपुर – आयुष्याच्या वळणावर अचानक एखाद्या प्रसंगी अनभिज्ञपणे अनोळखी व्यक्तीने आपल्या सानिध्यात यावे आणि कळत नकळत त्या व्यक्तिमत्त्वा.ची छाप पडून यशाची एक एक पायरी चढता चढता आपलं आयुष्यचं बदलून टाकणार , आयुष्याला कलाटणी देणार व्यक्तिमत्त्व जर प्रत्येकाला मिळालं तर ! …… ही
काही कल्पना वैगेरे नाही ……. अशाच आधारच व्यक्तिमत्व रेखाटलेली कादंबरी अपर्णा कल्लावार व रिमा रोहने लिखित ,” ओल्या सांजवेळी . ”

या कादंबरीचे विमोचन मातोश्री वृद्धाश्रम ,आदासा येथे व्यवथापक प्रदीप चन्दनबटवे यांच्या हस्ते करण्यात आले . या कार्यक्रमाला व्यवथापक प्रदीप चन्दनबटवे आणि प्रमुख पाहुणे म्हणुन श्री. गोगयानजी उपस्थित होते .

आयुष्यात विश्वास आणि अनुभव हे किती महत्त्वाचे असतात . विश्वासातून आलेले अनुभव आणि अनुभवातुन निर्माण झालेला विश्वास यांची सांगड लेखिकांनी उत्कृष्टपणे रेखाटली आहे . आपल्या सभोवताल उत्तम वैचारिक ठेवण असलेले व्यक्तिमत्व असणे कसे गरजेचे आहे , त्याचा आपल्या जीवनशैलीवर कसा सकारात्मक ठसा उमटतो हे कादंबरीच्या अनुषंगाने व्यवस्थापक प्रदीप चन्दनबटवे सरांनी आपले विचार त्यांच्या भाषणात सांगितले . नात्यांची गुंतागुंत ,एकमेकांवरचा विश्वास , समोरची धूसर वाट बघून रस्ता स्पष्टपणे दिसत नसतांना अतिशय सयंम ठेवून आपला विश्वास जिंकता यावा यासाठी केलेले प्रयत्न लेखिकेने अतिशय मार्मिकपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे असे प्रमुख वक्ता म्हणाले . कार्यक्रमाचे संचालन भारती दर्यापूरकर यांनी केले आणि आभार प्रदर्शन प्रफुल्ल मोटेवार यांनी केले .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …