Breaking News

*कन्हान येथे विविध संघटने द्वारे ७२ व्या प्रजासत्ताक दिन थाटात साजरा* *ठिक – ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करुन तिरंगा ध्वज ला सलामी देत महापुरुषांना केले अभिवादन*

*कन्हान येथे विविध संघटने द्वारे ७२ व्या प्रजासत्ताक दिन थाटात साजरा*

*ठिक – ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करुन तिरंगा ध्वज ला सलामी देत महापुरुषांना केले अभिवादन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान शहरात विविध संघटने द्वारे ७२ व्या प्रजासत्ताक दिना निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करुन तिरंगा ध्वज ला सलामी देऊन व महापुरुषांना विनम्र अभिवादन करीत मोठ्या उत्साहाने प्रजासत्ताक दिन कन्हान शहरात थाटात साजरा करण्यात आला .

कन्हान शहर विकास मंच

कन्हान शहर विकास मंच द्वारे गांधी चौक येथे प्रजासत्ताक दिना निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करुन सर्व महापुरुषांना अभिवादन करीत गणतंत्र दिवस थाटात साजरा करण्यात आला .
मंगळवार दिनांक २६ जानेवारी २०२१ प्रजासत्ताक दिना निमित्य कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात कन्हान शहर विकास मंच अध्यक्ष प्रवीण गोडे यांनी महात्मा गांधींच्या प्रतिमेवर , लाल बहादुर शास्त्रींच्या प्रतिमेवर , सरदार वल्लभ भाई पटेल यांचा प्रतिमेवर , व महात्मा ज्योतिबा फुले यांचा प्रतिमेवर पुष्प हार माल्यार्पण करुन व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता मंच उपाध्यक्ष रुषभ बावनकर , सचिव प्रदीप बावने , महासचिव संजय रंगारी , सुप्रित बावने यांनी प्रजासत्ताक दिना निमित्य मार्गदर्शन करुन महापुरुषांना अभिवादन केले . त्यानंतर कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अरुण त्रिपाठी यांना डायरी व पेन देऊन प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या . कार्यक्रमात उपस्थित सर्व मंच पदाधिकारी यांनी सर्व महापुरुषांच्या प्रतिमेवर पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत प्रजासत्ताक दिवस थाटात संपन्न करण्यात आला .
कार्यक्रमात कन्हान शहर विकास मंच चे अध्यक्ष प्रवीण गोडे , उपाध्यक्ष रुषभ बावनकर , सचिव प्रदीप बावने , सहसचिव संजय रंगारी , हरीओम प्रकाश नारायण , सुप्रित बावने , इस्प्रित बावने , मंच महिला सदस्य सुषमा मस्के , प्रकाश कुर्वे , शाहरुख खान , सचिन यादव , प्रवीण माने , सोनु खोब्रागडे , किशोर यादव सह अनेक मंच पदाधिकारी उपस्थित होते .
कार्यक्रमाचे सुत्र संचालन मंच सदस्य प्रवीण माने यांनी केले तर आभार मंच सदस्य प्रकाश कुर्वे यांनी व्यक्त केले .

कन्हान – पिपरी नगरपरिषद , कन्हान

कन्हान – पिपरी नगरपरिषद येथे प्रजासत्ताक दिना निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करुन नप नगराध्यक्षा करुणा आष्टणकर यांचा हस्ते ध्वजारोहण करुन सलामी दिली . कार्यक्रम उपस्थित सर्व नगरसेवक , नगरसेविकांनी , नगर परिषद अधिकारी कर्मचारी यांनी महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्प अर्पित कर विनम्र अभिवादन केले . कार्यक्रमात नप मुख्याधिकारी गिरीश बन्नोरे , नगराध्यक्षा करुणा आष्टणकर , उपाध्यक्ष योगेंद्र रंगारी , कार्यालय अधीक्षक सुशांत नरहरी , पंकज खवसे , फिरोज बिसेन , निरंजन बढेल , मोहनसिंह यादव , दिनेश्वर विश्वकर्मा , विरोधी पक्ष नेता राजेंन्द्र शेंदरे , नगरसेविका रेखा टोहणे , गुंफा तिडके , मोनिका पौणिकर , कल्पना नितनवरे , वर्षा लोंढे , सुषमा चोपकर , विनय यादव , राजेश यादव , अनिल ठाकरे , डायनल शेंडे , पुष्पा कावडकर , वंदना कुरडकर , संगीता खोब्रागडे , मनिष भिवगडे , अनिता पाटील , सह आदि नप अधिकारी कर्मचारी कार्यक्रमात उपस्थित होते .

काॅंग्रेस पार्टी कन्हान शहर

काॅंग्रेस पार्टी कन्हान शहर च्या वतीने गांधी चौक येथे प्रजासत्ताक दिना निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन अध्यक्ष राजेश यादव यांचा हस्ते व पारशिवनी तालुका अध्यक्ष दयाराम भोयर यांचा अध्यक्षतेखाली गांधी चौक येथे ध्वजारोहण करण्यात आले . यावेळी गणेश माहुरे , प्रशांत वाघमारे , आकिब सिद्धिकी , गुलाब बांते , सतीश भसारकर , डॉ शुभांगी बोंन्द्रे , कल्पना नितनवरे , शक्ति पात्रे , अमोल प्रसाद , पंकज गजभिए सह मोठ्या संख्येत काॅंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते या कार्यक्रमात उपस्थित होते .

राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी कन्हान शहर

राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी कन्हान शहर द्वारे आंबेडकर चौक येथे ७२व्या प्रजासत्ताक दिना निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करुन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेला हार माल्यार्पण करुन व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता शहर अध्यक्ष अभिषेक बेलसरे व कन्हान – कांन्द्री दुकानदार महासंघ चे अध्यक्ष अकरम कुरैशी यांचा हस्ते ध्वजारोहण करण्यात आले असुन पाच जेष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला . यावेळी किशोर बेलसरे , मधुरकर धोपाडे , पुरनदास तांडेकर , गणेश पानतावने , नरेंन्द्र वाघमारे , जनार्दन बागडे , शामबाबु पीपलवा , बबन रायपूरे , विश्वास सरोदे , मधुकर नागपुरे , मोरेश्वर सायरे , विनायक वाघधरे , लव तिवारी , पुरुषोत्तम कुंभलकर , शफीक शेख , बैज्जू ठेकेदार , मालवीय गुरुजी(वरिष्ठ पत्रकार) ,भगवानजी रछोरे , डॉ. प्रदीप राणे , राजु इंगोले , मोहन बेलसरे , बबलु पुणेकर , मायाताई भोयर , चित्राताई सायरे , तेजस्विनी बेलसरे , पुष्पाताई नागपुरे , संदयाताई सरोदे , सह मोठ्या संख्येत कन्हान येथील समस्त नागरिक व राकांपा सदस्य,युवा व महिला उपस्थित होते .
कार्यक्रम यशस्वीते करीता राकांपा कन्हान शहर अध्यक्ष अभिषेक बेलसरे , उपाध्यक्ष अनिल भालेकर , कार्याध्यक्ष डॉ. कमलेश शर्मा , महासचिव दिवाकर इंगोले , सचिव अश्विन सायरे , महिला उपाध्यक्ष विधानसभा सौ. योगिता भलावि तडसे, विधानसभा सचिव संगीत भारती , सोशल मीडिया अध्यक्ष रोहित मानवटकर , सुरज वरकडे , बाला सिंगेवार, निखिल सायरे , कुणाल चंदीले , आनंद बेलसरे , प्रतीक भोपडे , अमित आरभी , संदीप भायदे , आशिष नागपुरे , विजयभाऊ सिंदूरकर , अण्णा अगुटलेवर , नीलेश सायरे , गणेश रामापूरे , प्रमोद केजरकर , चेतन नांदूरकर , लेखन चंदेले ,मयूर बागडे , अमोल पोहरे , आदित्य जैन , परशुराम ठाकरे , नीरज सोनी , प्रीतम बागडे , रोशन मेश्राम , किशोर शेंडे , युवराज पात्रे, ब्रिजेश गायकवाड, प्रकाश कुर्वे,चेतन मेश्राम,अनिल हटवार,सावन पात्रे,जयराज गायकवाड, आनंद गुप्ता,अलकेश टेंबुरने, मन्या खडसे सह आदि ने सहकार्य केले .

टेकाडी ग्रामपंचायत , टेकाडी

टेकाडी ग्रामपंचायत येथे प्रजासत्ताक दिना निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन ग्रामविकास अधिकारी हरीदास रानाडे यांचा प्रमुख उपस्थिती मध्ये सरंपच सुनिता मेश्राम यांचा हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . यावेळी कार्यक्रमात उपसरपंच मिनाक्षी बुधे , सदस्य मिना झोड , दुर्गा राजपूत , सिंधु सातपैसे , सुरेश कामडे , जितेंन्द्र चौहान , विनोद इवनाते , त्रिभुवन सिंह , सह आदि नागरिक उपस्थित होते .

विदर्भ टेलर्स असोसिएशन ,
कन्हान

विदर्भ टेलर्स असोसिएशन कन्हान च्या वतीने प्रजासत्ताक दिना निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करुन शिवसेनेचे नेता प्रेम रोडेकर यांचा हस्ते ध्वजारोहण करण्यात आले असुन महापुरुषांचा प्रतिमेवर पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत प्रजासत्ताक दिवस साजरा केला . यावेळी धर्मदास भिवगडे , मनिष भिवगडे , पुष्पा कावडकर , सुरेखा टोहणे , प्रभाकर बावने सह आदि नागरिक उपस्थित होते .

प्राथमिक स्वास्थ्य केंद्र , साटक

प्राथमिक स्वास्थ्य केंद्र साटक येथे प्रजासत्ताक दिना निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करुन साटक ग्रामपंचायत सरपंच समा उकुंन्डे यांचा उपस्थिति मध्ये जिल्हा परिषद सदस्य व्यंकटेश कारेमोरे यांचा हस्ते ध्वजारोहण करुन प्रजासत्ताक दिवस थाटात साजरा करण्यात आला . या प्रसंगी डॉ प्रज्ञा आगे , डॉ तिवारी , भीमराव वाडीभस्मे , धर्मेंद्र गणवीर , उपसरपंच गजानन वांढरे , मनीराम वाडीभस्मे , गोविंद चोपकर , सतीश वाडीभस्मे , लीलाधर गुरुपंचांग , दिपक मोहनकर सह आदि नागरिक उपस्थित होते .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …