Breaking News

*विविध मांगण्यासाठी प्रहार चे तहसील कार्यालय वर धडक मोर्चा* *तहसीलदार वरुण कुमार सहारे यांनी १० दिवसाचे वेळ मागुन उपोषण मागे घेण्याची केली विनंती*

*विविध मांगण्यासाठी प्रहार चे तहसील कार्यालय वर धडक मोर्चा*

*तहसीलदार वरुण कुमार सहारे यांनी १० दिवसाचे वेळ मागुन उपोषण मागे घेण्याची केली विनंती*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

पारशिवनी – पारशिवनी तालुक्यातील बच्चेरा व चारगाव या गावाच्या विविध समस्या सोडविण्याचा मांगण्यासाठी प्रहार च्या कार्यकर्त्यांनी पारशिवनी तहसिल कार्यालयावर धडक मोर्चा काढुन प्रहार नागपूर जिल्हा प्रमुख रमेश कारामोरे , उपजिल्हा प्रमुख सलीम भैय्या बागाडे , तालुका प्रमुख आकाश दिवटे, राध्येश्याम नखाते, मोहन लोहकरे , कवडू गद्रे , कवडु खरखाटे , चंद्रशेखर राऊत, शुभम कडू, अभिषेक एकूनकर, रमेश तांदुळकर, शांताराम ढोगे, राजू कोरचाम्म सह अनेक गावकर्यांनी सकाळी ११ वाजता पासून उपोषणास सुरुवात केली असता तहसिल प्रशासन, वन विभाग , अन्न पुरवठा विभाग, पोलिस प्रशासन खळबळून जागे झाले असता अखेर दिवसभर तहसिल कार्यालयात महसूल अधिकारी, वन विभाग आणि भूमी अभिलेख विभाग , पोलिस प्रशासन , अन्न पुरवठा विभाग यांचा अनेक बैठका घेऊन अनेक मागण्या तात्काळ मान्य करण्यात आले असुन काही मागण्यांवर प्रशासनाने १० दिवसाची वेळ मागीतली असता तहसीलदार वरुण कुमार सहारे यांनी उपोषण मागे घेण्याची विनंती केली .

अखेर प्रशासनाला उर्वरित मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रशासनाला १० दिवसाचा वेळ देऊन आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले .
आंदोलनात मोठ्या संख्येत नागरिक उपस्थित होते .

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …